IMPIMP

BJP MLA Laxman Jagtap | आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्‍शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

by nagesh
BJP MLA Laxman Jagtap | Petrol bomb attack on construction office of Shankar Jagtap, brother of BJP MLA Laxman Jagtap

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड मधील भाजपचे ज्येष्ठ आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांचे बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांच्या कन्स्ट्रक्‍शन कार्यालयावर (construction office) पेट्रोल बॉम्ब टाकण्यात (Petrol bomb attack) आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 23) दुपारी पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे घडली. सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. मात्र भाजप आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांच्या भावाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यामुळे पिंपरी चिंचवड़ शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक (Builder) आहेत. पिंपळे सौदागर येथे त्यांचे चन्द्ररंग डेवलपर्स एंड बिल्डर्स प्रा लि (Chandrarang Developers And Builders Pvt. Ltd.) नावाचे कार्यालय आहे. मंगळवारी दुपारी तीन च्या सुमारास एका दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी आपल्याजवळील दोन पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या दिशेने फेकले. त्यानंतर ते दुचाकीवरून पळून गेले. त्यापैकी एक पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्‍ट्रिक डीपीजवळ पडला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ संजय शिंदे (Additional Commissioner of Police Dr. Sanjay Shinde),
पोलिस उपायुक्त आनंद भोईटे (DCP Anand Bhoite), सहायक आयुक्त श्रीधर जाधव (ACP Shridhar Jadhav),
सांगवी पोलिस स्टेशनचे (Sangvi Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे (Senior Inspector of Police Sunil Tonpe)
सह अन्य अधिकारी ही घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत.
काचेच्या बाटलीमध्ये काही प्रमाणात पेट्रोल टाकले जाते. दिव्याप्रमाणे त्याची वात बाहेर काढली जाते.
ज्या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब टाकायचा असतो तिथे ती वात पेटवून बाटली फेकली जाते.
बाटली फुटल्यावर स्फोट होतो. याला पेट्रोल बॉम्ब असे म्हणतात.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- BJP MLA Laxman Jagtap | Petrol bomb attack on construction office of Shankar Jagtap, brother of BJP MLA Laxman Jagtap

 

हे देखील वाचा :

Keshav Upadhye | ‘तिजोरीत 600 कोटी पण कोरोनाकाळात जनतेला वाऱ्यावर सोडलं, मृतांच्या वारसांना मदत करा

Gold Price Today | महिन्याभरात सोन्या-चांदीच्या दरात सर्वाधिक घट, सोनं 800 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या

Chandrakant Patil | राज्यातील विधानपरिषद निवडणूक बिनविरोध? चंद्रकांत पाटील म्हणाले…

 

Related Posts