IMPIMP

Keshav Upadhye | ‘तिजोरीत 600 कोटी पण कोरोनाकाळात जनतेला वाऱ्यावर सोडलं, मृतांच्या वारसांना मदत करा

by nagesh
BJP Leader Keshav Upadhye | hindutva mortgaged to pawar gandhi for cm post bjp leader keshav upadhye lashes out shiv sena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Keshav Upadhye | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) सत्तेवर येऊन दोन वर्ष झालीत. या पार्श्वभुमीवर विरोधकांनी आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांत राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. याबरोबरच आज भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच सरकारकडे काही मागण्या देखील केल्या आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

काय म्हणाले केशव उपाध्ये?

 

केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, ‘मास्कपासून व्हेंटिलेटरपर्यंत प्रत्येक मदतीसाठी केंद्र सरकारसमोर हात पसरून केंद्राच्या नावाने खडे फोडणाऱ्या ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) कोविड सहाय्यता निधीत 600 कोटींचा बेहिशेबी निधी पडून आहे. असे असतानाही राज्यातील कोरोना योद्ध्यांचे आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे वारस मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. निधी उपलब्ध नसल्याची खोटी कारणे देत ठाकरे सरकारने जनतेस वाऱ्यावर सोडले. 600 कोटींचा साह्य निधी दाबून न ठेवता तातडीने कोरोना मृतांच्या वारसांना मदत द्या.’ असं ते म्हणाले.

 

पुढे उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, ‘कोविडसंबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्याचा निर्णय आघाडी सरकारने 4 ऑगस्ट 2021 रोजी जारी केला.
पण, अद्यापही हे वारस अनुदानापासून वंचितच आहेत.
वारेमाप घोषणा करून सवंग लोकप्रियता मिळविण्याच्या हव्यासापोटी ठाकरे सरकार गरीब कोरोनाग्रस्त कुटुंबांची फसवणूक करत आहे.
मुख्यमंत्री कोविड साह्य निधीत पडून असलेल्या 600 कोटींचा निधी वापरावीना पडून असल्याचे उघड झाल्याने लोकांकडून मदतनिधीच्या नावाने जमा केलेल्या या पैशाचा आता तरी गरजूंच्या मदतीसाठी वापर करावा.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

‘गेल्या दोन वर्षांच्या कोरोना काळात ठाकरे सरकारने केवळ वसुलीचे काम केले.
कोरोना साह्य निधीच्या नावाने लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले.
मात्र त्यापैकी जेमतेम 25 टक्के निधीचाच विनियोग केल्याची कबुली सरकारनेच दिली आहे. उर्वरित 600 कोटींचा निधी वापरावीना पडून आहे.
कोरोनाचा फटका बसलेली जनता मात्र, आर्थिक विवंचनेमुळे त्रस्त आहे.
असा आरोप केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे.

दरम्यान, ‘ऊठसूठ पीएम केअर फंडावर (pm cares fund) डोळा ठेवून मदतीची याचना करणाऱ्या ठाकरे सरकारने हा पैसा दडवून कशासाठी ठेवला याची लोकायुक्तामार्फत चौकशी व्हावी,
अशी मागणी केली.
तर, ठाकरे सरकारने या निधीतून खर्च केलेल्या पैशांपैकी तब्बल 15 कोटी रुपये जाहिरातबाजीवर उधळले असल्याचेही स्पष्ट झाले असून,
संकटकाळातील सरकारी कर्तव्याचा गाजावाजा करून प्रत्यक्षात मात्र हा निधी वापराविना तिजोरीत दडवून ठेवला असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Keshav Upadhye | maharashtra have 600 crore corona relief fund help corona warriors and corona affected family demands bjp leader keshav Upadhye

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | महिन्याभरात सोन्या-चांदीच्या दरात सर्वाधिक घट, सोनं 800 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या

Chandrakant Patil | राज्यातील विधानपरिषद निवडणूक बिनविरोध? चंद्रकांत पाटील म्हणाले…

Tara Sutaria | तारा सुतारियानं हॉट फोटो शेअर करत केलं ‘तडप’चं प्रमोशन

 

Related Posts