IMPIMP

Blood Sugar | ‘या’ 6 लक्षणांवरून ओळखा तुम्ही सुद्धा डायबिटीजला बळी पडला आहात का?

by nagesh
Diabetes Patients Diet | diabetes patients should consume these things blood sugar will remain in balance

सरकारसत्ता ऑनलाइन – Blood Sugar | मधुमेह (Diabetes) हा सायलेंट किलर (Silent Killer) म्हणून ओळखला जाणारा आजार आहे. सायलेंट किलर म्हणजे हा आजार हळूहळू माणसाला पोकळ बनवत जातो. या आजाराचा परिणाम हृदय (Heart), यकृत (liver), डोळे (Eyes) आणि किडनी (Kidneys) या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर दिसून येतो. तज्ज्ञ सांगतात की, खराब जीवनशैली आणि चुकीचे खाणे-पिणे हे देखील मधुमेहाचे एक कारण आहे. हा आजार एवढ्या वेगाने पसरत आहे की आता लहान मुलांनाही होऊ लागला आहे. (Blood Sugar)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन (International Diabetes Federation) च्या मते, जगात मधुमेही रुग्णांची संख्या 42 कोटींपेक्षा जास्त आहे. 2045 पर्यंत या रुग्णांची संख्या 62 कोटींवर पोहोचेल, असे म्हटले जात आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा आजार शरीरात वाढण्यापूर्वीच त्याचे काही धोक्याचे संकेत शरीरात दिसू लागतात. या आजाराची लक्षणे ओळखली तर हा आजार टाळता येतो. शरीरातील शुगरच्या आजाराची लक्षणे (symptoms of sugar disease) कोणती आहेत, ते जाणून घेवूयात. (Blood Sugar)

 

1. भूक आणि थकवा जाणवणे (Feeling hungry and tired) –
मधुमेहाच्या रुग्णांना जास्त भूक लागते आणि जास्त थकवा जाणवतो. आपण जे काही खातो ते आपले शरीर ग्लुकोजमध्ये रूपांतरित करते, जे आपल्या पेशी ऊर्जेसाठी वापरतात.

 

पेशींना ग्लुकोज ग्रहण करण्यासाठी इन्सुलिनची आवश्यकता असते. जर आपले शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नसेल तर ग्लुकोज त्यांच्यात जात नाही आणि शरीराला ऊर्जा मिळत नाही. यामुळेच मधुमेही रुग्णांना जास्त भूक आणि थकवा जाणवतो.

 

2. जास्त लघवी आणि जास्त तहान (Excessive Urination)
मधुमेही रुग्णांना लघवी जास्त होते आणि तहान जास्त लागते. साधारणपणे, एक सामान्य व्यक्ती दिवसातून 4-5 वेळा लघवी करते, परंतु रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे, रुग्णाला दिवसातून 8-10 वेळा लघवी करावी लागते. जास्त लघवीमुळे जास्त तहान लागते. जेव्हा तुम्ही जास्त पाणी पिता तेव्हा तुम्ही लघवीही जास्त करता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3. वारंवार तोंड कोरडे पडणे (Frequent dry Mouth)
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णाला जास्त तहान लागते. या आजारात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, जे किडनी सहज फिल्टर करू शकत नाही. ही साखर लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडू लागते, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते आणि रुग्णाला वारंवार तहान लागते.

 

4. त्वचेवर खाज येणे (Itching of the skin)
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने त्वचेवर खाज सुटू लागते.
जर तुम्हाला तुमच्या मानेजवळ, काखेत, कंबर किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागाजवळ काळे डाग दिसले
तर ते रक्तामध्ये इन्सुलिनचे प्रमाण जास्त असल्याचे लक्षण आहे.

 

5. धूसर दृष्टी (Blurred vision)
ज्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते, त्यांना अस्पष्ट दिसते.
दृष्टी अंधुक होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रक्तातील अनियंत्रित साखरेचे प्रमाण होय.

 

6. जखम लवकर बरी न होणे
रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास रुग्णाची जखम लवकर बरी होत नाही.
कोणतीही जखम लवकर बरी होत नसेल तर लगेच साखरेची चाचणी करा.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Blood Sugar | what are the early 5 signs of diabetes know how to recognise it

 

हे देखील वाचा :

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2000 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

EPFO | पीएफ खातेधारकांसोबत होऊ शकते ऑनलाइन फसवणूक, EPFO ने सांगितली बचावाची पद्धत

Pimpri-Chinchwad Traffic Police | दिघी-आळंदी वाहतूक विभागांतर्गत ‘No Parking’ चे आदेश

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद !

 

Related Posts