IMPIMP

EPFO | पीएफ खातेधारकांसोबत होऊ शकते ऑनलाइन फसवणूक, EPFO ने सांगितली बचावाची पद्धत

by nagesh
EPFO | online fraud prevention tips in pf account epfo told its account holders to prevent cyber fraud by these easy tips

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाEPFO | गेल्या काही वर्षांत ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. देशात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून लोक ऑनलाइन प्लॅटफॉर्म (Online Platform) चा भरपूर वापर करू लागले आहेत. अशा स्थितीत फसवणूक करणारे लोक वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. (EPFO)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यासाठी ते फ्री व्हाउचर (Free Voucher), कॉल (Through Call), मेसेज (Through Message) आणि ईमेल (Email) इत्यादी गोष्टींचा अवलंब करतात. यामुळे लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून ते सर्व कमाई गमावतात. या कारणास्तव, बँका देखील त्यांच्या ग्राहकांना अशा फसवणूक करणार्‍यांपासून सावध राहण्यासाठी सतत सूचना देत आहेत (Online Fraud Prevention Tips in PF Account).

 

फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे EPFO ने आपल्या खातेदारांना इशाराही दिला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees’ Provident Fund Organisation) आपल्या सदस्यांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

 

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (EPFO Twitter Handle) याबद्दल ट्विट करत EPFO ने म्हटले आहे की, EPFO कधीही फोन, सोशल मीडिया (Social Media), व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) इत्यादीद्वारे आपल्या सदस्यांशी संपर्क साधत नाही. आधार कार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड (PAN Card), UAN, बँक खाते (Bank Details), OTP यांसारखे वैयक्तिक तपशील (Personal Details) विचारत नाही.

 

यासोबत पुढे लिहिले आहे की, कोणत्याही सेवेसाठी EPFO कधीही व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडिया इत्यादीद्वारे कोणतीही रक्कम जमा करण्यास सांगत नाही.
तसेच अशा खोट्या कॉल (Fraud Call) किंवा मेसेजला कोणत्याही सदस्याने उत्तर देऊ नये.
सायबर फसवणूक (Cyber Fraud) करणारे खाते रिकामे करण्यासाठी ही माहिती वापरू शकतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फसवणूक टाळण्याचे मार्ग
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळवण्यासाठी खातेधारकांना पैसे जमा करण्यास सांगत नाही.
कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी केली जात असल्यास, तुम्ही याविषयी माहिती घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-118-005 वर कॉल करू शकता.
याशिवाय खातेधारक EPFO कडून https://epfigms.gov.in वर माहिती मिळवू शकतात.

 

Web Title :- EPFO | online fraud prevention tips in pf account epfo told its account holders to prevent cyber fraud by these easy tips

 

हे देखील वाचा :

Pimpri-Chinchwad Traffic Police | दिघी-आळंदी वाहतूक विभागांतर्गत ‘No Parking’ चे आदेश

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद !

Pune Crime | तडीपारी संपलेल्या गुन्हेगाराने ५५ वर्षाच्या आईला केली मारहाण; शनिवार पेठेतील घटना

 

Related Posts