IMPIMP

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद !

by nagesh
Punit Balan Group | The first ‘Balan Trophy’ to win the under-12 cricket tournament; Aryans Cricket Academy team wins!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Punit Balan Group | स्पोर्ट्सफिल्डस् मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२
वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने द क्रिकेटर्स क्लब संघाचा ६ गडी राखून पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. (Punit Balan Group)

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

लिजंडस् क्रिकेट मैदान, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मयांक फुलझाळके याच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने द क्रिकेटर्स क्लबवर विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना द क्रिकेटर्स क्लबने १५९ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये आर्यन भामरे (५३ धावा) आणि अर्जुन सोनार (३७ धावा) यांनी संघाला दिडशे धावांचा टप्पा गाठून दिला. मयांक फुलझाळके याने २५ धावात ३ गडी टिपले. आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने हे आव्हान २३.४ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. यामध्ये अर्णव पाटील (५४ धावा), आर्यन कित्तुरे (३० धावा) आणि कर्णधार अव्देत वाणी (नाबाद २७ धावा) यांनी संघाचा विजय सोपा करत विजेतेपद मिळवून दिले. (Punit Balan Group)

 

 

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महेश सुंटाळे, अजित जांभुळकर, लिजंड्स स्पोर्ट्सचे विनायक सुर्यवंशी, पुनित बालन ग्रुपचे संतोष शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पोर्ट्सफिल्डस् मॅनेजमेंटचे सनी मारवाडी, अमित काळे, अक्षय जाधव, आनंद ओझा आदि मान्यवर उपस्थित होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

विजेत्या आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ आणि उपविजेत्या द क्रिकेटर्स क्लब संघाला करंडक व मेडल्स् देण्यात आली. तृतीय स्थान पटकावणार्‍या मास्टर्स क्रिकेट क्लबला करंडक देण्यात आला. या शिवाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू वेदांत गोरे (मास्टर्स सीसी, १९१ धावा, १० विकेट), सर्वोत्कृष्ट फलंदाज अर्णव पाटील (आर्यन्स् सीए, २०२ धावा), सर्वोत्कृष्ट गोलंदाज श्रेयस राठोड (मास्टर्स सीसी, १० विकेट), उदयोन्मुख खेळाडू संकर्षण खांडेकर (आर्यन्स् सीए), फेअर प्ले पुरस्कार गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ अशी पारितोषिके देण्यात आली.

 

 

स्पर्धेचा सविस्तर निकालः अंतिम फेरीः

द क्रिकेटर्स क्लबः २५ षटकात ७ गडी बाद १५९ धावा (आर्यन भामरे ५३ (४६, ५ चौकार), अर्जुन सोनार ३७, मयांक फुलझाळके ३-२५, स्वरीत पाटील २-१२);(भागिदारीः पाचव्या गड्यासाठी अर्जुन आणि आर्यन यांच्यात ९० (७५) पराभूत वि. आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २३.४ षटकात ४ गडी बाद १६० धावा (अर्णव पाटील ५४ (५४, ५ चौकार, १ षटकार), आर्यन कित्तुरे ३०, अव्देत वाणी नाबाद २७);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी आर्यन आणि अर्णव ९० (९२); सामनावीरः मयांक फुलझाळके;

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तृतीय स्थानासाठीः मास्टर्स क्रिकेट क्लबः २० षटकात ७ गडी बाद १४८ धावा (वेदांत गोरे ५१ (२३, ८ चौकार, १ षटकार), सोहम ढेरे २७, पार्थ अगरवाल २५, अर्जुन डोंगरे ३-२७) वि.वि. पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ९ गडी बाद ८७ धावा (देवाशिष घोडके नाबाद ३८, स्वराज संतोष १०, वेदांत गोरे ४-१८, सोहम ढोबळे २-२०); सामनावीरः वेदांत गोरेः

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Punit Balan Group | The first ‘Balan Trophy’ to win the under-12 cricket tournament; Aryans Cricket Academy team wins!

 

हे देखील वाचा :

Pune Crime | तडीपारी संपलेल्या गुन्हेगाराने ५५ वर्षाच्या आईला केली मारहाण; शनिवार पेठेतील घटना

Driving License Address Change | घरबसल्या ऑनलाइन बदलू शकता ड्रायव्हिंग लायसन्समधील पत्ता, कार्यालयात जाण्याची नाही गरज

Diabetes Food | मधुमेहींसाठी काळ्या हरभऱ्याचे पाणी वरदान, जाणून घ्या ते बनवण्याची आणि पिण्याची योग्य पद्धत

Pune Crime | खुनाच्या गुन्ह्यातून 8 वर्षांनी निर्दोष सुटला, स्वसंरक्षणार्थ पिस्टल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला

 

Related Posts