IMPIMP

BMC Vs Narayan Rane | नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार ?; महापालिकेची राणेंना दुसरी नोटीस !

by nagesh
Narayan Rane | Union minister and bjp leader narayan rane gets relief by bombay high court in adhish bungalow

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BMC Vs Narayan Rane | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांना मुंबई महापालिकेने Brihanmumbai Municipal Corporation (BMC) दुसरी नोटीस (Notice) पाठवली आहे. त्यांना पाठवण्यात आलेली दुसरी नोटीस ही वेस्ट विभागाकडून पाठवण्यात आली आहे. राणेंना आलेल्या दुसऱ्या नोटीसमुळे त्यांच्या बंगल्यावर हातोडा पडतो की काय ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC Vs Narayan Rane)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याआधी बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये त्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम (Ultimatum) देण्यात आला होता. 15 दिवसात तुम्ही स्वत: घर पाडणे नाहीतर कारवाई करावी लागेल, अशी नोटीस बजावण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अशीच नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्येही राणेंना 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. (BMC Vs Narayan Rane)

 

नक्की प्रकरण काय ?
मुंबईतील (Mumbai) जुहू येथे नारायण राणेंचा ‘अधिश’ (Adhish) नावाचा बंगला आहे. या बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम (Unauthorized Construction) झाल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राणेंच्या बंगल्याची दोनदा पाहणी करण्यात आली. त्यानंतर राणेंच्या बंगल्यासंदर्भात महापालिकेने नोटीस पाठवली होती. माहिती अधिकारी (Information Officer) संतोष दौंडकर (Santosh Daundkar) यांनी ही तक्रार केली होती.

दरम्यान, कोस्टर रेग्युलेशन झोन (Coastal Regulations Zone) नियमांचे उल्लंघन करुन हा बंगला बांधण्यात आला असल्याची तक्रार त्यांनी केली होती.
त्यामुळे आता राणेंच्या विरोधात कारवाई केली जाणार ? की राणे कोर्टात (Court) धाव घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- BMC Vs Narayan Rane | Brihanmumbai Municipal Corporation (BMC) second notice to bjp leader narayan rane for adhish bungalow in mumbai

 

हे देखील वाचा :

Folic Acid Benefits | पुरुषांमध्ये ‘ही’ एक महत्वाची गोष्ट वाढवते फॉलिक अ‍ॅसिड, जाणून घ्या याचे 5 मोठे फायदे आणि स्त्रोत

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेची मुख्य सभा आणि स्थायी समितीसह विषय समित्यांचेही कामकाज होणार; पण…

 

Related Posts