IMPIMP

Bombay High Court | ‘…हे राज्यपालांनी लोकशाहीचा गळा घोटल्यासारखं नाही का?’, उच्च न्यायालयानं भाजप आमदार गिरीश महाजनांना फटकारलं

by nagesh
Bombay High Court | mumbai bombay high court bjp girish mahajan maharashtra assembly speaker election governor bhagat singh koshyari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनविधानसभा (Legislative Assembly) अध्यक्ष (Speaker) आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक (Vice President Election) प्रक्रियेला जनहित याचिकेद्वारे आव्हान देणारे भाजप आमदार गिरीश महाजन (BJP MLA Girish Mahajan) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) फटकारलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) महाजन यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून (Petition Rejected) लावली. तसेच महाजन यांनी जमा केलेले 10 लाख रुपये जप्त करण्याचे आदेश दिले आहे. जनक व्यास (Janak Vyas) यांच्यासह महाजन यांनी जनहित याचिका केली होती. कोर्टाने त्यांचीही जनहित याचिका फेटाळली असून दोन लाख रुपयांची अनामत रक्कम जप्त केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमबदलाने लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. असे असेल तर राज्यपालांनी (Governor) 12 नामनिर्देशित सदस्यांची (Nominated Members) अद्याप निवड केलेली नाही, मग हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे नाही का ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) गिरीश महाजन यांना विचारला आहे.

 

 

राज्यपाल – मुख्यमंत्री यांच्या वादात नुकसान कोणाचे ?

महाराष्ट्राचे सध्याचे दुर्दैव असे आहे की राज्यातील दोन घटनात्मक पदे म्हणजे राज्यपाल आणि मुख्यमंत्री (CM) एकमेकांच्या सोबत नाहीत. त्यांच्या या वादात नुकसान कोणाचे होत आहे अशी विचारणा करत कोर्टाने महाजनांना फटाकारलं. विधान परिषदेच्या नामनिर्देशित 12 सदस्यांच्या निवडीबाबतचा आदेश देऊन आठ महिने उलटले आहेत. मात्र या आदेशाचाही आदर राखला गेला नाही, अशी टिप्पणी कोर्टाने (Mumbai High Court) राज्यपालांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

न्यायालयाची प्रश्नांची सरबत्ती
विधानसभेच्या अध्यक्षांबाबत लोकांना पडलेली आहे का ? इथे बसलेल्या किती जणांना लोकसभेचा अध्यक्ष कोण आहे हे माहित आहे ? विधानसभा अध्यक्ष कोण असावा याने जनतेच्या हिताचे कसे उल्लंघन होते ? अशी प्रश्नांची सरबत्तीच न्यायालयाने केली. तसेच याचिका दाखल करुन न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका अशा शब्दांत फटकारलं.

 

Web Title :- Bombay High Court | mumbai bombay high court bjp girish mahajan maharashtra assembly speaker election governor bhagat singh koshyari

 

हे देखील वाचा :

PMC Jumbo Covid Hospital | ‘कोरोना’ संसर्गाची दोन वर्षे पुर्ण ! जंबो आणि बाणेर कोव्हिड हॉस्पीटल बंद

Dolly Khanna Portfolio Multiagger Stock | ‘हा’ मल्टीबॅगर स्टॉक 1 महिन्यात रू. 320 वरून घसरून 250 रुपयांवर आला, एक्सपर्टने म्हटले – खरेदीची आहे संधी

Corporator Ravi Landage-Corporator Sanjay Newale | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला धक्क्यामागून धक्के, नगरसेवक रवि लांडगे, संजय नेवाळे यांचा राजिनामा

 

Related Posts