IMPIMP

Bombay High Court-Nagpur Bench | ‘प्रेमसंबंध तोडणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे’ – उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

by nagesh
HC On Minor Girl Rape Case | 'Intercourse with the consent of a minor girl is rape' - Delhi High Court

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Bombay High Court-Nagpur Bench | मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून (Bombay High Court-Nagpur Bench) एक महत्त्वपूर्ण निर्वाळा करण्यात आला आहे. प्रेयसीने दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह (Marriage) केले म्हणून तिच्याविरुद्ध प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असं नागपूर खंडपीठाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नेमकं प्रकरण काय आहे?

बुलडाणा जिल्ह्यातील (Buldhana) विवाहित जीवनचे पीडित मनीषाबरोबर विवाहबाह्य संबंध होते. त्यादरम्यान मनीषा अविवाहित होती. जीवनचा पत्नी सोबत वाद सुरू होता. त्याचा घटस्फोट झाला नसल्याने तो मनीषासोबत विवाह करण्यास असमर्थ होता. मनीषाने त्याचे मन वळविण्याचा अनेकदा प्रयत्न केला. दरम्यान जीवनने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यानंतर मनीषाने जीवन सोबतचे संबंध तोडले.

 

दरम्यान, यानंतर न्यायालयाने प्रकरण समजून घेऊन वादग्रस्त एफआयआर कायम ठेवल्यास मनीषावर अन्याय होईल, असं सांगितलं. जीवन पत्नी सोबतच्या वादामुळे आधीच मानसिक तणावात होता. मनीषाने दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह केल्याचा धक्का तो सहन करू शकला नाही, असा जीवनच्या आईचा आरोप होता. कोर्टाने यासाठी मनीषाला दोष दिला जाऊ शकत नाही, असं सांगितलं आहे. तर, मनीषा लग्न करण्यास तयार होती. जीवनने तिला सहकार्य केले नाही. जीवनने आत्महत्या करावी, अशी कोणतीही प्रत्यक्ष कृती मनीषाकडून करण्यात आली नसल्याचं न्यायालयानं (Court) म्हटलं आहे.

 

Web Title :- Bombay High Court-Nagpur Bench | breaking up a love affair is not an incentive to
commit suicide an important decision of the mumbai high court Bombay High Court-Nagpur Bench

 

हे देखील वाचा :

Maharashtra School Start | चला दप्तर भरा ! शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून तर शाळा 15 जूनला सुरू होणार

Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार?

Maharashtra Monsoon Entry | राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण; मुंबईत मोसमी पावसाची दमदार ‘एन्ट्री’, आज कुठे बरसणार?

 

Related Posts