IMPIMP

Buldhana Poisoning Case | भगर पीठ खाल्याने 20 जणांना विषबाधा, बुलढाणा मधील घटना

by nagesh
Buldhana Poisoning Case | 20 people were poisoned by eating bhagar flour fda officials went to work

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाइन Buldhana Poisoning Case | बुलढाण्यामध्ये (Buldhana) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भगर पीठ (bhagar flour) खाल्ल्याने गावातील अनेक लोकांना विषबाधा (Buldhana Poisoning Case) झाली आहे. सध्या या लोकांवर उपचार सुरु आहेत. गावातील बहुतांश दुकानदारांनी चिखलीमधून (Chikhali) माल घेतला होता. भगर पीठ खाल्ल्यामुळेच गावातील लोकांना हा त्रास झाला. त्यामुळं कोणत्या दुकानातून हे भगर पीठ आणले गेले होते. याचा तपास एफडीएच्या (FDA) अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यानंतर या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काल 21 सप्टेंबर रोजी एकादशी (Ekadashi) होती. त्यामुळे काल अनेक लोकांचा उपवास होता. ग्रामीण भागातील काही लोकांना उपवास असल्यामुळे त्यांनी भगर पीठ खाल्ला. यानंतर लोकांना काही वेळानंतर उलटी, डोकेदुखी, चक्कर येणे यासारखा त्रास सुरु झाला. हे भगर पीठ खाल्याने चिखली तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील जवळपास 15 ते 20 लोकांना विषबाधा (Buldhana Poisoning Case) झाली. या सगळ्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

ज्या लोकांना हा त्रास झाला त्या लोकांनी आपल्याच गावातील किराणा दुकानातून हे भगर पीठ घेतले होते.
या गावातील दुकानदारांनी हे पीठ चिखली येथील दुकानदारांकडून विकत घेतले होते.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास एफडीएचे अधिकारी करत आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.

 

Web Title :- Buldhana Poisoning Case | 20 people were poisoned by eating bhagar flour fda officials went to work

 

हे देखील वाचा :

Satara ACB Trap | 2 हजार रुपये लाच घेताना तहसील कार्यालयातील कारकुन आणि खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

PCMC Addl Commissioner | राजकीय दबावामुळे स्मिता झगडे यांचा बळी; नियुक्ती रद्द, अतिरिक्त आयुक्तपदावर प्रदीप जांभळे यांची वर्णी

Sachin Sawant | ‘लंपी ने मरत आहेत हजारो गोमाता, गोदी मिडीया भक्त आणि भाजपा नेते मात्र…’, काँग्रेस नेते सचिन सावंतांची मोदी सरकारवर टीका

 

Related Posts