IMPIMP

CCL | सीसीएलकडून पुण्‍यामध्‍ये वनस्‍पती-आधारित मांस उत्‍पादनांची श्रेणी लॉन्‍च

by nagesh
CCL | CCL launches range of Plant-Based Meat products in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  CCL | जागतिक स्तरावर ग्राहकांमध्ये टिकाऊपणा, पर्यावरणीय प्रभाव, औद्योगिक मांस पॅकिंग आणि स्थिर आहार याबद्दल जागरूकता वाढत आहे. गेल्या काही वर्षांत वनस्पती-आधारित मांसाची लोकप्रियता जागतिक स्तरावर तसेच भारतातही वाढत आहे. साथीच्या रोगाने वाढीला आणखी चालना दिली आहे. आज, व्यक्ती त्यांच्या आहार सेवनाबाबत जागरूक आहेत, ज्यामुळे अवलंबण्‍यासाठी वनस्पती-आधारित जीवनशैलीची संकल्पना नवीन आरोग्‍यदायी ट्रेण्‍ड बनले आहे. उद्योग संशोधन व विकास क्षमतेवर आधारित कॉन्टिनण्‍टल कॉफी (सीसीएल – CCL) या स्‍वदेशी कॉफी ब्रॅण्‍डने भारतात आपला वनस्पती-आधारित ब्रॅण्‍ड ‘कॉन्टिनण्‍टल ग्रीनबर्ड’ लॉन्च केला आहे. कॉन्टिनण्‍टल ग्रीनबर्ड ग्राहकांना मांसाची चव न गमावता जगभरात टिकाऊ असलेल्‍या निवडी करण्यास सक्षम करते. कॉन्टिनण्‍टल ग्रीनबर्ड ब्रॅण्‍ड पहिल्यांदा हैदराबादमध्ये जुलै २०२२ मध्ये लॉन्‍च करण्यात आला होता आणि आता पुण्यात उपलब्ध आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्योग संशोधनानुसार भारतातील मांस पर्यायी बाजारपेठ जवळपास ३०० कोटी असल्याचा अंदाज आहे, ज्यात मुख्यत्वे ग्राहक-पॅकेज केलेल्या फूडचा समावेश आहे. ३ वर्षात बाजाराचा आकार ३५०० कोटींच्या आसपास पोहोचण्याचा अंदाज आहे*. वनस्पती-आधारित मांस ही संकल्पना टिकाऊपणाबद्दल ग्राहकांमधील वाढत्या जागरूकतेतून तयार केली गेली आहे. याव्यतिरिक्त, वनस्पती-आधारित मांस पर्यायांच्या विकासामागे अन्न निवडी आणि पशु कल्याणावरील हवामानाचा प्रभाव ही काही प्रमुख कारणे आहेत. वनस्पती-आधारित मांस हे देखील नियमित मांसापेक्षा आरोग्यदायी असते, कारण ते कोलेस्टेरॉल आणि ट्रान्स-फॅटपासून मुक्त आहेत आणि नॉन-जीएमओ (जनुकीय सुधारित जीव) आहेत.

 

या लॉन्‍चसह सीसीएलची मांस आवडी व गिल्‍ट-फ्री सवयींमधील पोकळी भरून काढत शाश्‍वपूर्ण उत्‍पादनांचा शोध घेणाऱ्या वाढत्‍या ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍याची योजना आहे. कॉन्टिनण्‍टल ग्रीनबर्डसह सीसीएल सुरूवातीला चार वनस्‍पती-आधारित मांस प्रकार सादर करेल: चिकन-लाइक नगेट्स, चिकन-लाइक सीख कबाब, चिकन-लाइक सॉसेज व मटन-लाइक कीमा. त्‍यांची सर्व उत्‍पादने वनस्‍पती-आधारित प्रथिनांपासून बनवण्‍यात येतात, जी हिरवे वाटाणे, चणे यापासून आणि कीमाच्‍या बाबतीत सोयापासून घेण्‍यात आली आहेत. हे वास्‍तविक मांसासारखी चव व पोत निर्माण करण्‍यासाठी तयार करण्‍यात आले आहे आणि उत्तम स्‍वाद देखील कायम राखते. ग्राहक माहितीनुसार पुण्‍यातील लोकांना फूड श्रेणीतील अशा नाविन्‍यपूर्ण संकल्‍पनांबाबत माहित आहे. कॉन्टिनण्‍टल ग्रीनबर्डसह सीसीएल (CCL) आता ग्राहकांसाठी प्राण्‍यांच्‍या बाबतीत कोणतीही क्रूरता न करता मांसचा तोच स्‍वाद, फील व पोत देईल.

 

ही प्रथिनयुक्त वनस्पती-आधारित उत्पादने मांसाहारी ग्राहकांसाठी योग्य आहेत, ज्यांना मांसाची चव आणि पोत न सोडता निरोगी आहाराची निवड करायची आहे. हे शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम ऑफर देखील आहे, जे त्यांचे प्रथिन आणि फायबरचे सेवन वाढवण्याचे पर्याय शोधत आहेत. ही उत्पादने अशा ग्राहकांसाठी देखील योग्‍य आहेत, ज्यांचे मांस सेवन धार्मिक कारणांमुळे प्रतिबंधित आहे. ज्यामुळे त्यांना चवीशी कोणतीही तडजोड न करता गिल्‍ट-फ्री स्नॅकिंगची संपूर्ण नवीन संधी मिळते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कॉन्टिनण्‍टल ग्रीनबर्डच्‍या लॉन्‍चबाबत बोलताना कॉन्टिनण्‍टल कॉफीचे व्‍यवसाय प्रमुख, सौरभ खुराणा म्‍हणाले,
“वनस्पती-आधारित मांसाची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे आणि सीसीएलमध्‍ये आम्हाला भविष्याचा नक्कीच अभिमान आहे
की, आम्ही प्रत्येकासाठी वनस्पती-आधारित खाद्यपदार्थांचा आस्‍वाद घेण्याची संधी देण्‍याचा प्रयत्न करत आहोत,
अधिक टिकाऊ भविष्यासाठी योगदान देत आहोत. साथीच्या रोगाने देशात या विभागाच्या वाढीला चालना दिली आहे.
या श्रेणीमध्ये एक सकारात्मक प्रगती झाली आहे, जेथे ग्राहकांचा मोठा समूह शाकाहारी/वनस्पती-आधारित जीवनशैलीचा अवलंब करत आहे.
यामुळे आम्हाला अन्नाच्या शाश्वत आणि आरोग्‍यदायी स्त्रोतांकडे वळवण्यासाठी कॉन्टिनण्‍टल ग्रीनबर्ड लॉन्‍च करण्‍यास प्रेरणा मिळाली.
कॉन्टिनण्‍टल ग्रीनबर्डसह आम्ही वनस्पती प्रथिन घटकांपासून बनवलेली स्वादिष्ट आणि पौष्टिक उत्पादने ऑफर करतो,
जी विशेषत: जे त्यांच्या आहाराबद्दल जागरूकपणे निवड करतात आणि पृथ्‍वी व त्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात
याबाबत जागरूक असलेल्‍या ग्राहकांना त्यांच्या शाश्वत जीवनशैलीशी जुळणारे दर्जेदार उपाय शोधण्यास सक्षम बनवतात.’’

 

वनस्‍पती-आधारित मांसच्‍या आरोग्‍यदायी लाभांबाबत सांगताना कॉन्टिनण्‍टल ग्रीनबर्डच्‍या न्‍यूट्रिशनिस्‍ट रीना शुक्‍ल म्‍हणाल्‍या, “साथीच्या रोगानंतर सर्वजण आरोग्‍याला अधिक प्राधान्‍य देत आहेत. जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी जागरूकपणे …

 

Web Title :- CCL | CCL launches range of Plant-Based Meat products in Pune

 

हे देखील वाचा :

Lingayat Community | राज्यस्तरीय उच्च शिक्षीत लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा रविवारी पुण्यात

Maharashtra Police Recruitment | अखेर पोलीस भरतीचा मार्ग मोकळा, कमाल वयोमर्यादेत शिथिलता; ‘या’ उमेदवारांना होणार फायदा

T20 World Cup 2022 | भारताविरुद्धच्या पराभवानंतर शाकिब अल हसनला ‘त्या’ वक्तव्यावरून वीरेंद्र सेहवागने फटकारले, म्हणाला…

 

Related Posts