IMPIMP

T20 World Cup 2022 | भारताविरुद्धच्या पराभवानंतर शाकिब अल हसनला ‘त्या’ वक्तव्यावरून वीरेंद्र सेहवागने फटकारले, म्हणाला…

by nagesh
T20 World Cup 2022 | virender sehwag slams shakib al hasan on his statement after ind beat ban in t20 world cup

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : भारताने बांगलादेशवर (Bangladesh) मात करत T -20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) उपांत्य फेरीच्या दिशेने जोरदार वाटचाल केली आहे. या सामन्यात भारताने 5 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात बांगलादेशच्या पराभवानंतर शाकिब अल हसनला भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) फटकारले आहे. (T20 World Cup 2022)

 

काय म्हणाले वीरेंद्र सेहवाग ?
”कर्णधाराने याची जबाबदारी घेतली पाहिजे ना. त्याआधी शांतो बाद झाला, त्यानंतर शाकिबही त्याच षटकात बाद झाला. त्यामुळे तिथेच चूक झाली. 99/3, 100/4, 102/5, पडलेल्या त्या 3 विकेट्समध्ये एक मोठी भागीदारी झाली असती, असे नाही की तुम्हाला टी-20 मध्ये 50 धावांची भागीदारी आवश्यक आहे. 10 चेंडूत 20 धावांची भागीदारीही खेळाला कलाटणी देऊ शकते.” तसेच तो पुढे म्हणाला कि त्याच्या मते ही चूक होती, अगदी कर्णधाराचीही. तो कर्णधार आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, जबाबदारी घ्यायला हवी होती आणि कोहली खेळतो तसा तो शेवटपर्यंत खेळायला हवा होता. अशा वेळी संघाला अडचणीतून बाहेर काढावे अन्यथा अशी थेट उलट-सुलट विधाने करू नयेत.” असे म्हणत वीरेंद सेहवागने त्याला फटकारले आहे. (T20 World Cup 2022)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाला होता शाकिब अल हसन
बांग्लादेशचा (Bangladesh) कॅप्टन शाकीब अल हसनने (Shakib Al Hasan) आपल्याच टीमबद्दल धक्कादायक वक्तव्य केले होते.
आमची टीम टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आलेली नाही, असे वक्तव्य यावेळी शाकीबने भारताविरुद्धच्या सामन्याच्या अगोदर केले होते.
भारताविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या मॅचआधी शाकीबने हे चक्रावून टाकणारे वक्तव्य केले होते.

 

Web Title :- T20 World Cup 2022 | virender sehwag slams shakib al hasan on his statement after ind beat ban in t20 world cup

 

हे देखील वाचा :

Tiger 3 | टायगर 3 चित्रपटात ‘ही’ टीव्ही अभिनेत्री दिसणार महत्वाच्या भूमिकेत

MLA Santosh Bangar | मंत्रालयाच्या गेटवर आमदार संजय बांगर यांची पोलिसांना शिवीगाळ? ‘तू मला शिकवणार का?’

Shahajibapu Patil | ‘त्या’ विधानावरुन शहाजीबापूंचा अजित पवारांना खोचक सवाल, म्हणाले- ’95 साली कुठल्या गावाला गेला होता?’

CM Eknath Shinde | ‘…पण उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला खुलासा

 

Related Posts