IMPIMP

Chandrakant Khaire | किर्तिकरांना म्हातारचळ लागलय, चंद्रकांत खैरेंचा शेलक्या शब्दात हल्लाबोल

by nagesh
Chandrakant Khaire | uddhav thackeray camp leader chandrakant khaire slams gajanan kirtikar over joining eknath shinde camp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन शिवसेनेत (Shivsena) गळती सुरुच असून शिवसेनेचे तेरावे खासदार गजानन किर्तिकर (MP Gajanan Kirtikar) यांनी देखील शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावर शिवसेनेचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire), संजय राऊत (Sanjay Raut), अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी गजानन किर्तिकर यांच्या जाण्याने त्यांच्यावर टीका केली आहे. गजानन किर्तिकर यांना या वयात म्हातारचळ लागलय, असे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

किर्तिकर शिंदे गटात गेल्यामुळे मला दु:ख झाले आहे. ते सुरुवातीच्या काळात आमचे मार्गदर्शक होते. त्यांनी आम्हाला घडविले आहे. गजानन किर्तिकर यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत काम केले होते. या काळात पक्षाने त्यांना पाचवेळा आमदार आणि दोन वेळा खासदार केले होते. इतके सगळे दिल्यानंतर देखील किर्तिकर या वयात गद्दारांसोबत गेले आहेत. त्यांना म्हातारचळ लागले आहे, असे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले.

 

गजानन किर्तिकर यांना काही गोष्टी पटत नव्हत्या, तर त्यांनी अगोदर सांगायला पाहिजे होते. त्यांनी पक्षात राहून मते मांडली पाहिजे होती. काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीसोबत (NCP) अडीच वर्षे सरकार होते. ही बाब जर त्यांना मान्य नव्हती, तर त्यांनी पहिल्याच दिवशी विरोध करायला पाहिजे होता. आता ते उगाच काहीतरी सांगत आहेत. त्यांना म्हातारचळ लागलय, अशा शेलक्या शब्दात खैरेंनी गजानन किर्तिकरांवर टीका केली.

 

गजानन किर्तीकर पक्षातील ज्येष्ठ नेते होते. या वयात पक्षाने त्यांना सर्वकाही देऊ केले.
तरी ते गेले. त्यांचे चिरंजिव अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) कडवट शिवसैनिक आहेत.
आणि ते आमच्यासोबत आहेत. किर्तीकरांनी सर्व काही भोगलेले आहे.
त्यामुळे किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी एक वेगळी भावना निर्माण होते.
यामुळे फार काही फरक पडत नाही. ठीक आहे ते गेले.
उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील, असे संजय राऊत म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrakant Khaire | uddhav thackeray camp leader chandrakant khaire slams gajanan kirtikar over joining eknath shinde camp

 

हे देखील वाचा :

Uday Samant | ‘महाराष्ट्रातील उद्योजकांना विकास करण्यासाठी ताकदीचा मुख्यमंत्री मिळावा म्हणून आम्ही राजकीय पाऊल उचलले; कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही’

Narendra Modi Stadium | काँग्रेस नरेंद्र मोदी स्टेडीयमचे नाव बदलणार; निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन

NCP Umesh Patil On Rajan Patil | ‘राजन पाटील यांच्यामुळे मला पाटील म्हणवून घेण्यासाठी सुद्धा लाज वाटते’ – उमेश पाटील

Raveena Tandon | रवीना टंडनचे मोठे वक्तव्य ! “माधुरी दीक्षित 90 च्या दशकातील सुपरस्टार पण आमिर- सलमान…”

 

Related Posts