IMPIMP

Uday Samant | ‘महाराष्ट्रातील उद्योजकांना विकास करण्यासाठी ताकदीचा मुख्यमंत्री मिळावा म्हणून आम्ही राजकीय पाऊल उचलले; कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही’

by nagesh
Uday Samant | as no one has come with a power dont show it off says uday samant

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन   उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) ठाण्यात आयोजित बिझनेस यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उदय सामंत (Uday Samant) यांनी भाषण केले आणि विविध मुद्यांना हात घातला.

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्री असा कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. त्यामुळे कोणीही सत्तेचा माज किंवा उन्माद दाखवू नये. जेवढा काळ सत्ता असेल तेवढा काळ जनतेचे काम केले पाहिजे. महाराष्ट्रातील उद्योजकांना विकास करण्यासाठी ताकदीचा मुख्यमंत्री मिळावा म्हणून आम्ही राजकीय पाऊल उचलले असल्याचे यावेळी सामंत (Uday Samant) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी पुढे बोलताना सामंत म्हणाले, आधीचे उद्योगमंत्री कोणत्याच कार्यक्रमाला जात नव्हते. मी सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतो. उद्योगांचे प्रश्न मंत्रालयात बसून सोडविण्यापेक्षा मी उद्योग मंत्रालय घेऊन उद्योजकांकडे आले पाहिजे, अशी संकल्पना राबवायला आम्ही सुरुवात केली आहे. सरकार उद्योगांना सवलती देऊन त्यांच्यावर कोणतीही मेहरबानी करत नाही. त्यांना सवलती देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे शासनाचा उद्योग विभाग उद्योजकांसोबत आहे. इंडोनेशियातील सिनारमनस कंपनीचा प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणार आहे.
शासनाकडे त्या प्रकल्पाने 37 कोटी जमा केले आहेत.
आम्ही बैठक बोलावून 25 हजार 368 कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे.
गेल्या दोन वर्षात राज्यातील उद्योग ठप्प होते.
त्यांना अनुदान आणि सवलती मिळत नव्हत्या. पण आता आम्ही त्या सुरु केल्या आहेत.

 

Web Title :- Uday Samant | as no one has come with a power dont show it off says uday samant

 

हे देखील वाचा :

Narendra Modi Stadium | काँग्रेस नरेंद्र मोदी स्टेडीयमचे नाव बदलणार; निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन

NCP Umesh Patil On Rajan Patil | ‘राजन पाटील यांच्यामुळे मला पाटील म्हणवून घेण्यासाठी सुद्धा लाज वाटते’ – उमेश पाटील

Raveena Tandon | रवीना टंडनचे मोठे वक्तव्य ! “माधुरी दीक्षित 90 च्या दशकातील सुपरस्टार पण आमिर- सलमान…”

 

Related Posts