IMPIMP

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांचं आव्हान, म्हणाले – ‘उत्पल पर्रिकरांना उमेदवारी देतो, संजय राऊतांनी ही जबाबदारी घ्यावी’

by nagesh
Sanjay Raut on Chandrakant Patil | shiv sena mp sanjay raut has once again lashed out at bjp state president chandrakant patil in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपचे (BJP) दिवंगत नेते मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकीट नाकारले जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी राजकीय वातावरण तापवून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजपने जर उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारली आणि ते जर अपक्ष उभे राहिले तर सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असे राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या आव्हानाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यात (Pune) बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी दिली तर त्या मतदारसंघातून विरोधी पक्ष लढणार नाहीत आणि ही निवडणूक (Election) बिनविरोध कराल का, असा सवाल चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विचारला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) उत्पल पर्रिकर यांना भाजपने तिकीट द्यावे, यासाठी संजय राऊत उठाठेव कशाला करत आहेत. त्यांचं कोणी ऐकणार आहे का ? संजय राऊत यांच्यात इतकीच हिंमत असेल तर त्यांनी गोव्यातील एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी. राऊत यांना मनोहर पर्रिकर यांच्या मुलाबद्दल बरचं प्रेम आहे. उत्पल पर्रिकर यांना तिकीट द्यायचे की नाही, याबद्दल भाजपने अद्याप निर्णय घेतलेला नाही. पण उद्या जर भाजपने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी दिली तर त्या मतदारसंघातून विरोधी पक्ष निवडणूक लढणार नाहीत आणि ही निवडणूक बिनविरोध करणार का याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. यासाठी तुम्ही तयार आहात का  ? असा सवाल चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे.

 

काय म्हणाले होते संजय राऊत ?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रिकर यांच्यासाठी सर्वपक्षीय मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
यासंदर्भात आज मुंबईत (Mumbai) बोलताना संजय राऊत म्हणाले की, मनोहर पर्रिकर यांनी गोव्यात पक्ष वाढवला.
मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर भाजपने त्यांच्या कुटुंबाशी ज्याप्रकारे वैर घेतले आहे.
ही गोष्ट आम्ही दुसऱ्या पक्षातील असूनही पटत नाही.
त्यांची पात्रता काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मात्र सर्व राजकीय पक्ष (Political Party) उत्पल पर्रिकर यांच्या पाठीशी असल्याने भाजपला याचा विचार करावा लागेल.
भाजपला त्यांना पणजी मधून (Panaji) उमेदवारी द्यावीच लागेल.
भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही आणि ते जर अपक्ष लढले तर सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या पाठिशी उभे रहावे,
अशी भूमिका शिवसेनेची असल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil reply on sanjay raut urges bjp should give utpal parrikar cadidature in goa polls

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Kolhapur | गुन्ह्यात मदत करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे लाच मागणारा पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Chandrakant Patil | शरद पवारांच्या मेट्रो ट्रायलनंतर चंद्रकांत पाटलांचा सवाल, म्हणाले – ‘आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम जनतेला कळत नाही का?’

Maratha Reservation | सरकार मराठा समाजाच्या कुठल्याच मागण्यांचा विचार करत नाही – संभाजीराजे

 

Related Posts