IMPIMP

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला’

by nagesh
Chandrakant Patil | who will perform mahapuja in pandharpur chief minister uddhav thackeray - chandrakant patil

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन –  Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आज (मंगळवारी) सांगली (Sangli) जिल्हा दौ-यावर होते. त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) हल्लाबोल केला आहे. ‘शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलाच पक्ष संपवला,’ अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

सांगली येथील पेठ नाका येथे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सदस्यांचा सत्कार प्रसंगी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उपस्थित होते.
त्यावेेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘भाजप (BJP) हाच महाराष्ट्रात पहिल्या क्रमाकांचा पक्ष असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तर, शिवसेनेने मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपविला आहे. हे अजूनही त्यांच्या लक्षात येईना, असा टोला देखील पाटील यांनी लगावला आहे.

 

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सध्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने 21 जागा जिंकल्या. त्यामुळे भाजप (BJP) राज्यात एक नंबरचा पक्ष झाला आहे.
काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीला (NCP) 17 जागा मिळाल्या तर शिवसेनेला फक्त 12 जागाच मिळाल्या.
मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने आपला पक्षच संपवला आहे. गावोगावी राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव सुरु केला.
तरीही ही गोष्ट शिवसेनेच्या लक्षात येत नाहीये. असो, हा त्यांचा प्रश्न आहे.
यापुढे भाजप सर्व निवडणूका पक्ष चिन्हावरच लढवेल. असं देखील पाटील  यांनी म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Chandrakant Patil | bjp state president chandrakant patil criticize shivsena about chief minister post in sangli

 

हे देखील वाचा :

Saral Pension Yojana | तुम्ही एकदा प्रीमियम देऊन आयुष्यभर मिळवू शकता पेन्शन, जाणून घ्या ‘या’ विशेष योजनेबाबत सर्वकाही

Aishwarya Rai | ऐश्वर्या रायला आलिया भट्टच्या भावानं केलं होतं ‘बेइज्जत’, दोघांमध्ये 36 चा आकडा; जाणून घ्या दुश्मनीचं कारण

Life Certificate | पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! आता पेन्शन मिळवण्यासाठी केवळ तुमचा चेहरा उपयोगी येईल, कागदपत्रे जमा करण्याची नाही आवश्यकता

 

Related Posts