IMPIMP

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल; म्हणाले – ‘राज्यात टोळीचे सरकार चाललंय काय ?’

by nagesh
Chandrakant Patil | chandrakant patil targets rohit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil | मागील काही दिवसापुर्वी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुणे महापालिका (Pune Corporation) आवारात धक्काबुक्की करण्यात आली. यानंतर भाजप (BJP) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) सवाल करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”केंद्राची सुरक्षा असतानाही किरीट सोमय्या यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत सोमय्या यांच्यावरील हल्ला आम्ही सहजासहजी घेणार नसल्याचा इशारा पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला. तसेच, घरात घुसू देणार नाहीत, नागपुरात फिरू देणार नाही, असे वक्तव्य करण्यात येत असल्याचे सांगत राज्यात टोळीचे सरकार चाललंय काय ? असा जोरदार सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशीसाठी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पत्र पाठविले असल्याचेही ते म्हणाले.”

 

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, ”सोमय्या यांच्यावरील हल्ल्याची घटना घडली त्यावेळी सुट्टी होती, असे असतानाही महापालिकेत एवढा जमाव कसा जमला ?  असा सवाल करत त्यांनी पुणे महापालिकेत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
यावेळी त्यांनी ज्यांची घरे काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारण्याचे काम करू नये, असा टोलाही त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला. 26 नोव्हेंबर 2019 ला विश्वास घात करून सत्तेत आलेल्या सरकारला 27 महिने होतील,
या 27 महिन्यात अनेक उलथापालथ झाल्या, मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. ठाकरे कुटुंबावर आरोप झाले पण कधी असे झाले नाही,”
असं देखील ते म्हणाले.

 

 

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”कोण आहेत हे देशमुख अनिल परब (Anil Parab) यांच्यावर आरोप करत आहेत.
कोण आहेत परमबीर सिंग (Parambir Singh) ज्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) आरोप केला.
या सर्वांना धमक्या द्या असे म्हणत बाळासाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर
गुडघे टेकायचे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर गुडघे टेकायचो, पण आता यांचे गुडघे टेकण्याचे चित्र बदलले असल्याचे ते म्हणाले.”

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  Chandrakant Patil | chandrakant patil corner maharashtra government on somaiya attack in pune corporation 

 

हे देखील वाचा :

MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंना जामीन मिळताच CM उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले…

Pune Crime | दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

Atal Pension Yojana (APY) | फक्त 7 रुपायांची करा बचत अन् सुनिश्चित करा 5 हजार रुपयाची पेन्शन; 71 लाख लोकांनी घेतला लाभ, जाणून घ्या

 

Related Posts