IMPIMP

Chandrakant Patil On BJP MNS Alliance | ‘सध्या तरी मनसेसोबत युती शक्य नाही, परंतु…’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
Chandrakant Patil | minister deepak kesarkar responded to shivsena party split claim made by bjp leader chandrakant patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil On BJP MNS Alliance | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक
पवित्रा घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मनसे-भाजप युती (BJP MNS Alliance) होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चेला खुद्द मनसे
अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पूर्णविराम दिला होता. दरम्यान, मशिदींवरील भोंग्यांच्या (Loudspeaker On Masjid)
प्रश्नावरून राज्यात वातावरण तापले असतानाच आता पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सध्या तरी भाजप-मनसे युती शक्य नाही असे सांगत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. परंतु, राज ठाकरे भविष्यात मित्र असू शकतात. केंद्रीय पातळीवरूनच त्याचा निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याच्या विषयावर राज्य सरकारला (Maharashtra State Government) 3 मे पर्यंतचे अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेची भूमिका समान आहे. त्यामुळेच पुन्हा भाजप- मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांची भूमिका ही भाजपची पटकथा असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी सध्या तरी मनसेसोबत युती शक्य नाही परंतु भविष्यात राज ठाकरे आमचे मित्र असू शकतात.

 

 

”कोणत्याही पक्षासोबत जायचे असेल तर त्याचा निर्णय राज्याची कोअर कमिटी घेत असते. असे असले तरी मनसेसोबत जाण्याचा निर्णय केंद्रातूनच घेतला जाईल. मात्र मनसेची परप्रांतीयांबाबत असलेल्या भूमिकेचाही विचार आम्हाला करावा लागेल. सध्या तरी युतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही,” पाटील यांनी स्पष्ट केले.

 

 

Web Title : Chandrakant Patil On BJP MNS Alliance | Chandrakant Patil On BJP MNS Alliance | ‘At present, alliance with MNS is not possible, but …’ – Chandrakant Patil

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लघुशंकेसाठी थांबणे तरुणाला पडले महागात, चोरट्याने सिनेस्टाईल मोटारसायकल नेली पळवून

Pulses For Cholesterol | हार्ट अटॅक-स्ट्रोकला कारणीभूत ठरणार्‍या ’बॅड कोलेस्ट्रॉल’ शरीरातून बाहेर काढतील ‘या’ 5 प्रकारच्या डाळी; जाणून घ्या

Sanjay Raut on MP Navneet Rana | खा. नवनीत राणांच्या अडचणीत वाढ, संजय राऊतांच्या आरोपांनंतर कर्ज प्रकरणाची चौकशी?

 

Related Posts