IMPIMP

Chandrapur Crime News | माजी केंद्रीय मंत्र्याच्या पुतण्यासह आणखी एकाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; चंद्रपूरमधील घटना

by nagesh
Chandrapur Crime News | the body of two youths including the nephew of a former union minister was found

चंद्रपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – चंद्रपूरमध्ये (Chandrapur Crime News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर (Union Minister of State for Home Hansraj Ahir) यांच्या पुतण्याचा आणि आणखी एका व्यक्तीचा मृतदेह चंदीगढ येथील जंगलात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेमुळे (Chandrapur Crime News) परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महेश अहिर (Mahesh Ahir), हरीश धोटे (Harish Dhote) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. महेश अहिर आणि हरीश धोटे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. चंदीगड पोलीस (Chandigarh Police) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे नेमके प्रकरण?
मृत महेश हरिश्चंद्र अहिर आणि त्याचा मित्र हरीश धोटे हे काही दिवसांपूर्वी घरून बेपत्ता झाले होते.
यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान चंदीगढ येथील सेक्टर 43 मधील
बसस्थानक (आयएसबीटी-43) समोरील सेक्टर 52 अंतर्गत येणाऱ्या कजेहडी गावाशेजारील जंगलात दोघांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची नोंद सेक्टर 36 पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

यानंतर चंदीगड पोलिसांनी हे दोघे तरुण ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या ठिकाणी चौकशी केली असता ते
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले. यानंतर चंदीगड पोलिसांनी बुधवारी चंद्रपूर पोलिसांशी
संपर्क साधला. यानंतर आढळून आलेले मृतदेह हे महेश अहिर आणि हरीश धोटे यांचे असल्याचे उघडकीस आले.
या तरुणांनी आत्म्हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवून चंदीगढ पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

 

 

Web Title :- Chandrapur Crime News | the body of two youths including the nephew of a former union minister was found

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यातील ओशो आश्रमाच्या परिसरात गोंधळ घालणार्‍या तब्बल 130 अनुयायांच्याविरूध्द कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा

CM Eknath Shinde | अखेर मुहुर्त ठरला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला अयोध्या दौऱ्यावर जाणार

Congress MP Rahul Gandhi | सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय?, मानहानी केसमध्ये राहुल गांधी दोषी, सुरत कोर्टाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा

 

Related Posts