IMPIMP

Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थींना लवकरच अनुदान

by nagesh
Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana | Grant soon to eligible beneficiaries of Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Samman Yojana

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी (Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana) नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेतील पात्र उर्वरीत लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळेल, असे सहकार मंत्री अतुल सावे (Aurangabad BJP MLA And Minister Atul Save) यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यवतमाळ जिल्ह्यातील १ लाख २८ हजार ४६४ शेतकऱ्यांना अद्यापही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नाही. याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

 

सहकार मंत्री सावे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तीन टप्प्यात राबविली आहे.
आतापर्यंत दीड लाख कर्ज परतफेड योजना, वनटाइम सेटलमेंट आणि नियमित कर्ज परतफेड प्रोत्साहनपर ही
योजना राबविली गेली आहे. या योजनेतंर्गत ज्या पात्र लाभार्थींना या योजनेचे लाभ मिळाले नाहीत त्यांना मार्च २०२३
अखेर अनुदान देण्यात येईल. नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी एक हजार कोटी
रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही मंत्री सावे यांनी सांगितले.

सदस्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही यासंदर्भात उपप्रश्न उपस्थित केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-   Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana | Grant soon to eligible beneficiaries of Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Samman Yojana

 

हे देखील वाचा :

Jio Cricket Plan | आयपीएलआधी जिओने लॉन्च केले ‘हे’ तीन जबरदस्त प्लॅन्स; जाणून घ्या प्लॅन्सची खासियत

Pune Crime News | चंदननगर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन केला अत्याचार

 

Related Posts