IMPIMP

Chinchwad by-Election | ‘जगताप कुटुंबियांना उमेदवारी दिल्यास, निवडणुक बिनविरोध करावी..,’ – आमदार आण्णा बनसोडे यांची मागणी

by nagesh
Chinchwad by-Election | pimpri ncp mla anna bansode demand unopposed election if jagtap family get nonimation for pimpri chinchwad election

पिंपरी-चिंचवड : सरकारसत्ता ऑनलाईन   Chinchwad by-Election | काही दिवसांपूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांचे निधन झाले. त्यानंतर रिक्त झालेल्या जागी आता पोटनिवडणूक (Chinchwad Constituency By Election) जाहीर झाली असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) स्थानिक नेते इच्छुक असल्याचे विधान अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले होते. त्यावर आज पिंपरी मतदारसंघाचे आमदार आण्णा बनसोडे म्हणाले की, जर जगताप कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आली, तर ही निवडणुक बिनविरोध (Chinchwad by-Election) करावी. एका वृत्तपत्राशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. (Pimpri-Chinchwad Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षाचे काम केले आहे. अनेक पदे त्यांनी राष्ट्रवादी पक्षात असताना भूषवली आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला पाहिजे. अशी स्पष्ट भूमिका पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी व्यक्त केली.

 

दरम्यान, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदार संघातील रिक्त जागेवर पोटनिवडणुक जाहीर झाली असून त्यासाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय चर्चेला सुरूवात झाली आहे. भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) किंवा बंधू शंकर जगताप (Shankar Jagtap) यांना उमेदवारी मिळू शकते. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकांवर चर्चा झाल्याचे समजते. (Chinchwad by-Election)

 

पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष यांनी आम्ही निवडणूक लढणार आहोत. असे स्पष्ट केले होते.
मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे देखील ते म्हणाले होते. असे असताना त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी ही निवडणुक बिनविरोध व्हावी. अशी भूमिका घेतली आहे. जगताप कुटुंबियास उमेदवारी दिली गेल्यास ही निवडणूक बिनविरोध व्हावी. अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक राजकारणात दुफळी तर निर्माण झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आण्णा बनसोडे यांनी आपली याबाबत असलेली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की,
‘जगताप कुटुंबीयांपैकी कोणालाही भाजपने उमेदवारी दिल्यास ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी,
या मताचा मी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला पाहिजे.
दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षाचे काम केले आहे.
जगताप यांच्या कुटुंबीयांपैकी कोणी निवडणूक लढवली नाही तर राष्ट्रवादीने ही निवडणूक लढवावी.
पण, दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप असतील किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी
मिळाली तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी.’ मात्र यावर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

 

Web Title :- Chinchwad by-Election | pimpri ncp mla anna bansode demand unopposed election if jagtap family get nonimation for pimpri chinchwad election

 

हे देखील वाचा :

Bhaskar Jadhav | ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे निवडणूक आयोगावर ताशेरे; म्हणाले…

Chhagan Bhujbal | सत्यजीत तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळेलही, पण त्यांच्यामुळे बाळासाहेब थोरात अडचणीत आले – छगन भुजबळ…

Chandrakant Patil | राज्यातील डबल इंजिनचं सरकार विरोधकांची धडकी भरवणार! – चंद्रकांत पाटील

 

Related Posts