IMPIMP

Chandrakant Patil | राज्यातील डबल इंजिनचं सरकार विरोधकांची धडकी भरवणार! – चंद्रकांत पाटील

by nagesh
Chinchwad Bypoll | pimpri chinchwad bypoll election who will bjp candidate chandrakant patil gave hint

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. त्यात त्यांनी विरोधकांवर टीका करताना लिहिले आहे की, ‘राज्यातील डबल इंजिनचे सरकार विरोधकांची धडकी भरवणार!’ त्याला त्यांनी (Chandrakant Patil) काल (दि.२०) रोजी एमपीएससी (MPSC Recruitment 2023) मार्फत काढल्या गेलेल्या ८१६९ जागांच्या जाहिरातीचा संदर्भ देण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यांनी (Chandrakant Patil) आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘डबल इंजिनचं सरकार विरोधकांची धडकी भरवणार! महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC नं तब्बल ८१६९ जागा भरण्यासाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या वेबसाईटवर जाहिरात प्रसिध्द झाली आहे. विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू करा! धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)!’ असा मजकूर लिहित त्यांनी ट्वीट केले आहे.

 

 

दरम्यान, काल (दि.२०) रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC Recruitment) आत्तापर्यंतची
सर्वात मोठ्या पदभरतीची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.
ही भरती प्रक्रिया २०२३ या वर्षात आयोगाकडून राबविण्यात येणार आहे.
या जागा महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क यांसाठी भरती करण्यात येणार आहे.
यात एकूण ८१६९ जागा भरण्यात येणार आहेत. यातील सर्वात अधिक ७०३४ जागा या लिपिक व टंकलेखक
(Clerk and Typist) पदासाठी भरण्यात येणार आहेत.

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रथमच एवढ्या मोठ्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याने या निर्णयाचे स्वागत स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
या पदभरतीसाठी आयोगाकडून २५ जानेवारी २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये विहित नमुन्यात
अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्यातील ३७ जिल्ह्यातील परिक्षा केंद्रांवर ३० एप्रिल २०२३ रोजी पूर्व परिक्षा
घेण्यात येणार आहे. तर अराजपत्रित गट ब सेवेसाठीची मुख्य परिक्षा ही २ सप्टेंबर २०२३ ला घेण्यात येणार आहे
तर गट क साठीची मुख्य परिक्षा ९ सप्टेंबर २०२३ ला घेण्यात येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrakant Patil | the government of double engine will scare the opponents chandrakant patil

 

हे देखील वाचा :

Mahesh Bhatt | परवीन बाबी यांच्यासाठी पत्नी व मुलीला सोडलेल्या महेश भट्ट यांनी अभिनेत्रीबाबत केला हा खुलासा

Maharashtra Politics | ‘मविआ’ सरकारच्या काळात बंद केलेली ही योजना झाली परत सुरू; या योजनेच्या माध्यमातून मिळू शकते सरकारसोबत काम करण्याची संधी

Siddharth Jadhav | सिद्धार्थ जाधव लवकरच ‘या’ बहुप्रतीक्षित चित्रपटात झळकणार

 

Related Posts