IMPIMP

CM Eknath Shinde | अयोध्येला निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा, म्हणाले-‘मला जुन्या विषयांवर बोलायला…’ (व्हिडिओ)

by nagesh
CM Eknath Shinde | Chief Minister Eknath Shinde's directive to provide necessary facilities to the followers coming to Chaityabhoomi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) शनिवार (दि.8) पासून दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर
(Ayodhya Tour) जात आहेत. अयोध्येला जाण्यासाठी विमानतळावर (Mumbai Airport) आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी
बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजित पवार (Ajit Pawar), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका
केली. जे लोक कधी दिसतही नव्हते ते रस्त्यावर उतरले आहेत. चांगले परिवर्तन आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी
उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, आम्ही अयोध्येत उत्साहाने जात आहोत, तिथे खूप चांगली आणि उत्साहाने तयारी होत आहे. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अनेक जण चालले आहेत. कुणी ट्रेनने तर कुणी विमानाने जात आहे. एक चांगला उत्साह कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही रामलल्लाचं दर्शन घ्यायला जात आहोत त्यातही विरोधकांना टीका करावीशी वाटते आहे तर त्यांना काही सुचेनासं झालं आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

 

हे चांगलं परिवर्तन आहे

आपण गेल्या सात ते आठ महिन्यात राज्याच्या लोकांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. आपण चांगले निर्णय घेतल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पूर्वी कुठे दिसत नव्हते ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत. लोकांना भेटू लागले आहेत हे चांगलं परिवर्तन आहे. काही लोकं बरेही झाले आहेत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

 

 

मला जुन्या विषयांवर बोलायला…

अजित पवारांनी काही बोलूच नये, शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर ते काय देतात? मला जुन्या विषयांवर बोलायला लावू नका, असं म्हणत अजित पवारांना सुनावलं. राम मंदिर व्हावं ही रामभक्तांची, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Late Balasaheb Thackeray) यांचं स्वप्न होतं. अयोध्या आणि आणचं एक जिव्हाळ्याचं नात आहे. राम मंदिर उभारण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) करत आहेत आणि योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) त्यांना सहकार्य करत आहेत ही अभिमानाची बाब आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यांच्या जन्म झाला नव्हता तेव्हापासून…

राज्यात रावणराज आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले होते यावर विचारलं असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जाऊ द्या हो त्यांचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून मी काम करतो आहे. विरोधकांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या. आम्ही त्याला बोलून उत्तर देणार नाही तर आमच्या कामाने उत्तर देऊ असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर जास्त बोलण टाळलं आहे.

 

Web Title :  CM Eknath Shinde | cm eknath shinde taunts uddhav thackeray before his ayodhya visit

 

हे देखील वाचा :

Railway Protection Force (RPF) | वर्षभरात आरपीएफनं दिलं 86 लोकांना जीवदान, रेल्वे अपघातातून वाचवलं

TDM Marathi Movie | भाऊंच्या TDM मधील ‘मन झालं मल्हारी’ गाणं रिलीज, पृथ्वीराज- कालिंदा जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस (व्हिडीओ)

Ajit Pawar In Patrakar Sangh Pune | यापुढे पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत : अजित पवार

 

Related Posts