IMPIMP

CM Eknath Shinde | महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by nagesh
 CM Eknath Shinde | Mahabaleshwar, Panchgani Take measures to free plastic

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन- CM Eknath Shinde | प्लास्टिक हे आरोग्यासाठी नाही तर पर्यावरणासाठी ही हानिकारक आहे. त्यामुळे महाबळेश्वर (Mahabaleshwar ) पाचगणी (Panchgani) ही गिरिस्थाने प्लास्टिक मुक्त (Plastic Free) करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी व इतर परिसरातील पर्यटन विषयक विविध विभागांकडील प्रलंबित कामांचा आढावा बैठक राजभवन, महाबळेश्वर येथे संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

 

 

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde), आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil), जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी (Collector Ruchesh Jayavanshi), मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी (Chief Executive Officer Dyaneshwar Khillari), पोलीस अधीक्षक समीर शेख (SP Sameer Sheikh) यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

अस्तित्वात असलेले रस्ते दुरुस्तीसाठी वन विभागाने (Forest Department) परवानगी विचारू नये अशा सूचना देऊन मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मंजूर केलेल्या कामांच्या लवकरात लवकर निविदा काढाव्यात, पार्किंगला शिस्त लावण्यासाठी उपाययोजना कराव्यात, त्यासाठी नगरपरिषदेने शंभर वाहतूक वॉर्डन पूर्वावेत, पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरील अतिक्रमणे हटवित, साबणे रस्त्याचे काम नियोजन प्रमाणे गटार ते गटार करण्यात यावे अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी दिल्या. बैठकीमध्ये वेण्णा लेक परिसर विकास, पार्किंग, तसेच सुशोभीकरण या विषयी ही चर्चा करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  CM Eknath Shinde | Mahabaleshwar, Panchgani Take measures to free plastic

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन – बिल जास्त झाल्याच्या विचारणेवरुन डोक्यात दारुची बाटली फोडली

Roll Ball World Cup Tournament In Pune | सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात केनिया संघाला विजेतेपद

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : मिळकतकराची बिले 1 मे पासून नव्हे तर ‘या’ तारखेपासून मिळणार, 15 जुलैपर्यंतच मिळणार सवलत

 

Related Posts