IMPIMP

CNG Price Hike In Pune | पुण्यात आता सीएनजी 73 रुपये किलो; 10 दिवसात सीएनजीच्या दरात 11 रुपयानी वाढ

by nagesh
CNG Price Hike In Pune | CNG now costs Rs 73 per kg in Pune; CNG price hiked by Rs 11 in 10 days

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनCNG Price Hike In Pune | आंतरराष्ट्रीय बाजारात सीएनजी गॅसच्या (CNG Gas) मिश्रणासाठी लागणाऱ्या विशिष्ट
वायुच्या दरात दुप्पट वाढ झाल्याचे कारण देत एक आठवड्यापूर्वी सीएनजीच्या दरात (CNG Price Hike In Pune) ६ रुपयांनी वाढ केली होती. आता
आज पुन्हा सीएनजीच्या दरात प्रति किलो ५ रुपयांनी वाढ केली आहे. त्याामुळे आता पुणे शहरात (Pune City) सीएनजीचा दर प्रति किलो ७३ रुपये
इतका झाला आहे. एका आठवड्यात तब्बल ११ रुपयांनी वाढ झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्य शासनाने (Maharashtra State Government) १ एप्रिलपासून व्हॅटचा कर कमी केल्याने ६.३० रुपयांनी सीएनजीचे दर कमी झाले होते. त्यामुळे
वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, आठवड्यात दोनदा दरवाढ करण्यात येत आहे. पुणे शहरात बुधवार (दि.१३) मध्यरात्रीपासून
सीएनजीचे (CNG Price Hike In Pune) प्रति किलो ५ रुपयांनी पुन्हा वाढणार असल्याने ग्राहकांना आता ७३ रुपये मोजावे लागणार आहे.

 

 

राज्य शासनाने व्हॅट कमी करुन सीएनजीचा वापर करणार्‍या वाहनांना दिलासा दिला होता. हा दिलासा केवळ ४ दिवस टिकला. कंपनीने दरवाढ करुन वाहनचालकांना होणारा फायदा काढून घेतला आहे. आता तर १ एप्रिल पूर्वी असलेल्यापेक्षा सीएनजीचे दर अधिक झाले आहेत.

 

 

सीएनजीचे (CNG Price Hike Today) दर बुधवार (दि.१३) मध्यरात्रीपासून शहरात ६८ रुपये प्रति किलोवरून ७३ रुपये प्रति किलोपर्यंत वाढणार आहेत. या प्रचंड वाढीचे मुख्य कारण म्हणजे सीएनजी गॅसच्या मिश्रणात एक विशिष्ट आयात करण्यात येणाऱ्या वायूच्या वाढीचे आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) या विशिष्ट गॅसची आंतरराष्ट्रीय किंमत दुप्पट झाली आहे.
त्यामुळे ही एकदम मोठी दरवाढ करण्यात येत असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे
(All India Petrol Dealers Association) प्रवक्ते अली दारुवाला (Ali Daruwala) यांनी सांगितले.

 

Web Title :- CNG Price Hike In Pune | CNG now costs Rs 73 per kg in Pune; CNG price hiked by Rs 11 in 10 days

 

हे देखील वाचा :

MNS Sandeep Deshpande | मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले – ‘त्यावेळची वसंतसेना आणि आताची शरदसेना’

Rajiv Gandhi Academy of E-Learning PMC Pune | ‘राजीव गांधी ई लर्निंग स्कूलमध्ये सर्वसामान्य घटकातील मुलांचे भवितव्य घडविले जाते’ – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

MNS Leader Vasant More | वसंत मोरेंचं ठाण्यात भाषण; म्हणाले – ‘राज ठाकरेंची ब्लू प्रिंट पहायची असेल तर कात्रजला या’

 

Related Posts