IMPIMP

Rajiv Gandhi Academy of E-Learning PMC Pune | ‘राजीव गांधी ई लर्निंग स्कूलमध्ये सर्वसामान्य घटकातील मुलांचे भवितव्य घडविले जाते’ – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

by nagesh
Rajiv Gandhi Academy of E-Learning PMC Pune | 'Rajiv Gandhi e-learning school shapes the future of ordinary children' - Former Union Home Minister Sushilkumar Shinde

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Rajiv Gandhi Academy of E-Learning PMC Pune | पुणे महानगरपालिकेचे Pune Municipal Corporation (PMC) राजीव गांधी ई लर्निंग स्कूलच्या (Rajiv Gandhi E-Learning School Pune) माध्यमातून जात, पात, धर्म न पाहता विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे (English Medium) उत्तम शिक्षण दिले जाते, आणि या मुलांचे भवितव्य घडविले जाते ही अतिशय समाधानाची बाब आहे. या प्रकल्पाची संकल्पना करून ती महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करणार्‍या आबा बागुल (Aba Bagul) यांचे मी अभिनंदन करतो असे उद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी काढले. सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत राजीव गांधी ई लर्निंग शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. (Rajiv Gandhi Academy of E-Learning PMC Pune)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, समाजामध्ये जिद्द असणे सर्वात महत्वाचे आहे. जिद्द व दृढसंकल्प असेल तर यश निश्चित येते, मी दहावी परीक्षेमध्ये अपयशी झालो तरी खचलो नाही, मी प्रयत्न पूर्वक शिक्षण घेतले. पदवीधर होऊन पुढे वकिली पूर्ण केली, परीस्थितीशी झगडून पुढे जाणे हे प्रत्येकाने शिकले पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले. (Rajiv Gandhi Academy of E-Learning PMC Pune)

 

 

अध्यक्षस्थानी जेष्ठ गांधीवादी विचारवंत काँग्रेसचे नेते उल्हास पवार (Ulhas Pawar) होते, या प्रसंगी पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते व राजीव गांधी ई लर्निंग शाळेचे प्रवर्तक आबा बागुल यांनी स्वागत प्रास्ताविक केले. ते म्हणाले की सुशीलकुमार शिंदे हे आमच्या पिढीचे रोल मॉडेल (Role Model) आहेत. त्यांनी जीवनात आतिशय संघर्ष करून मुख्यमंत्री (CM), केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister), राज्यपाल (Governor) अशी मोठी पदे भूषवून देशाला दिशा देण्याचे मोठे काम केले, त्यांचा आदर्श हा सर्वच विद्यार्थ्यानी घेण्यासारखे आहे.
जात. पात, धर्म, गरीबी, श्रीमंती असा भेदाभेद मनात न मानता केवळ जिद्दीने व मेहनतीने त्यांनी
मिळवलेले यश आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील, त्यांचे मार्गदर्शन दहावीतील विद्यार्थ्यांना
मिळावे यासाठी ते आले हे आपल्या विद्यार्थ्यांचे भाग्यच आहे असे मी मानतो. असे ते म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या प्रसंगी सतीश पवार, रमेश सोनकांबळे, द.स.पोळेकर, चंद्रशेखर पिंगळे,
नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, विश्वास दिघे, गोरख मरळ आदी उपस्थित होते.
घनश्याम सावंत यांनी सूत्रसंचालन तर अमित बागुल यांनी आभार मानले.

 

Web Title :- Rajiv Gandhi Academy of E-Learning PMC Pune | ‘Rajiv Gandhi e-learning school shapes the future of ordinary children’ – Former Union Home Minister Sushilkumar Shinde

 

हे देखील वाचा :

MNS Leader Vasant More | वसंत मोरेंचं ठाण्यात भाषण; म्हणाले – ‘राज ठाकरेंची ब्लू प्रिंट पहायची असेल तर कात्रजला या’

Neil Kirit Somaiya | किरीट यांच्यानंतर नील सोमय्यांनाही कोर्टाचा धक्का; पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार

Pranitha Subhash Pragnancy News | प्रणिता सुभाषनं पति सोबत रोमांटिक फोटो शेअर करून चाहत्यांना दिली गोड बातमी…

 

Related Posts