IMPIMP

Communist Party of India | वेगळ्या राजकारणाचे संकेत, लाल बावट्याचा भगव्याला पाठिंबा, ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून भाजपविरोधात लढणार!

by nagesh
Communist Party of India | communist party of india cpi delegation met shivsena uddhav thackray and pledged full support to shivsena candidate in andheri by election 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन एकेकाळी एकमेकांचे हाडवैरी असलेल्या कम्युनिस्ट पार्टीने (Communist Party of India) आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी (Andheri East By-Election) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला (Shivsena) पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यातील आणि देशातील राजकारणातील ही मोठी घडामोड मानता येईल. पूर्वी मुंबईच्या लालबाग, परळसारख्या भागात लाल बावट्याचे वर्चस्व होते, ते कमी करण्यासाठी शिवसेनेने जीवाची बाजी लावली होती. हाणामार्‍या झाल्या, रक्त सांडले, आणि हा संघर्ष खूनापर्यंत (Murder) गेला. परंतु, आता राजकारण बदलले आहे. काहीतरी वेगळे घडत आहे, याचा संकेत कम्युनिस्टांनी (Communist Party of India) शिवसेनेला दिलेल्या पाठींब्यावरून मिळत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कम्युनिस्ट पार्टीने (Communist Party of India) आणि शिवसेनेने या संघर्षाच्या आठवणी कालबाह्य झाल्याच्या समजून आणि बदलत्या राजकीय स्थितीला तोंड देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत लढू. भाजप (BJP) विरोधातील लढाईतही तुमच्या साथीला असू, असा विश्वास कम्युनिस्ट नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी अडीच वाजता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यात माकपचे सचिव कॉम्रेड मिलिंद रानडे (Comrade Milind Ranade), ज्येष्ठ नेते कॉ. प्रकाश रेड्डी (senior leader Com. Prakash Reddy), प्रकाश नार्वेकर (Prakash Narvekar), बाबा सावंत (Baba Sawant), व्यापारी संघटनेचे नेते विजय दळवी (Vijay Dalvi) आणि बबली रावत (Babli Rawat) यांचा समावेश होता.

 

कम्युनिस्टांनी अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देणे ही राजकारणातली मोठी घडामोड आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची ताकद अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मर्यादित असली
तरी दोन टोकाच्या विचारधारा एकत्र येणे, शिवसेना स्थापन झाली
तेव्हापासून सेनेचा कम्युनिस्टांसोबत अतिशय तीव्र संघर्ष राहिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये अक्षरश: हाडवैर होते. या संघर्षातूनच कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई (Krishna Desai) यांची मुंबईत 1970 मध्ये हत्या झाली होती. गिरणी कामगारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी दोन्ही संघटनांमध्ये अतिशय तीव्र स्पर्धा होती. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) तर कम्युनिस्ट पक्षाचा उल्लेख लाल माकडे असे करीत असत. पण मधल्या काळात बदललेल्या राजकारणाला तोंड देण्यासाठी हे हाडवैरी एकत्र आले आहेत.

 

शिवसेना आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा प्रभाव कमी करण्याचा शिवसेनेने अ
टोकाट प्रयत्न केला. हा संघर्ष अगदी टोकाला गेला असताना कम्युनिस्ट
नेते आमदार कृष्णा देसाई यांची 5 जून 1970 या दिवशी हत्या झाली.
त्यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती.
त्यांच्या हत्येचा संशय शिवसेनेवर होता. देसाई यांच्या हत्येनंतर परळच्या पोटनिवडणुकीत त्यांची
पत्नी सरोजिनी कृष्णा देसाई आणि शिवसेनेच्या वानराव महाडिक यांच्यात थेट लढत झाली.
या निवडणुकीत वामनराव महाडिकांनी (Vamanrao Mahadika)
1679 मतांनी विजय मिळवून शिवसेनेचा भगवा प्रथमच विधानसभेत नेला.

 

Web Title :- Communist Party of India | communist party of india cpi delegation met shivsena uddhav thackray and pledged full support to shivsena candidate in andheri by election 2022

 

हे देखील वाचा :

Swachh Bharat Abhiyan | ऋतुजा भोसले, डॉ. सलील कुलकर्णी पुणे शहर ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही; ते जेव्हा अस्वस्थ होतात तेव्हा… – चंद्रशेखर बावनकुळे

Prakash Ambedkar | काँग्रेस आणि शिवसेनेला युतीचा पर्याय दिला आहे, पण त्यांचे अजून उत्तर आले नाही – प्रकाश आंबेडकर

 

Related Posts