IMPIMP

Computer Engineer Arrested In Pune | पुणे : दुकानातून लॅपटॉप चोरणाऱ्या कॉम्प्युटर इंजिनियरला सायबर पोलिसांकडून अटक

by sachinsitapure
arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Computer Engineer Arrested In Pune | कॉम्प्युटर विक्री व दुरुस्तीच्या दुकानातील लॅपटॉप चोरणाऱ्या व इतर साहित्य परस्पर विकून ग्राहकांनी दिलेल्या पैशांचा अपहार करुन 4 लाखांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) करणाऱ्या संगणक अभियंत्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या (Shivaji Nagar Police Pune) सायबर पथकाकडून (Pune Cyber Crime) अटक करण्यात आली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2023 ते 17 जानेवारी दरम्यान शिवाजीनगर येथील इनर स्पेस कॉम्प्युटर्स येथे घडला आहे.

याबाबत गिरीश विजय हासुरकर (वय-50 रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी 17 फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन समीर रामनाथ थोरात Sameer Ramnath Thorat (वय-39 रा. म्हातोबा नगर, कोथरुड) याच्यावर आयपीसी 420, 408 नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे दुबईला गेले असता आरोपीने दुकानातील चार लॅपटॉप व इतर साहित्य परस्पर विकून ग्राहकांनी दिलेल्या पैशांचा अपहार करून पसार झाला होता.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा मागोवा
घेत सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याच्याकडून एक लाख 40 हजार रुपये किमतीचे लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक व पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी,
रुचिका जमदाडे यांनी केली आहे.

Related Posts