IMPIMP

Pune Rural Police | बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक, 11 लाखांचा ऐवज जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी (Video)

by sachinsitapure
Pune-Rural-Police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Rural Police | एस.टी. स्टँडवर बसमध्ये बसण्याच्या बहाण्याने गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने व रक्कम चोरी करणाऱ्या सराईत महिला आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या महिलेकडून 11 लाख 64 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहे. ही कारवाई अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत परिसरात करण्यात आली. (Pune Rural Police arrested Woman for stealing jewelery from passengers at bus station)

अश्विनी अवि भोसले (वय-23 रा. माही जळगाव ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. 2 मार्च रोजी फिर्यादी अलका वसंतराव बनकर (वय-59 रा. अकलुज ता. माळशिरस) या इंदापूर येथून बस मधून पुण्याकडे येत होत्या. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने बॅगेतील लहान पर्स चोरली. या पर्समध्ये साडे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 8 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याबाबत इंदापुर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा (Pune LCB) आणि इंदापूर पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडून केला जात होता. दरम्यान, हा गुन्हा रेकॉर्डवरील महिला आरोपी अश्विनी भोसले हिने केल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. तसेच ही महिला कर्जत परिसरात येणार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने कर्जत परिसरात सापळा रचून आरोपी महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपासात तिने यापूर्वी खेड, इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दाखल गुन्ह्यातील दागिन्यांपैकी 235 ग्रॅम वजनाचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 11 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहे. महिला आरोपी अश्विनी भोसले ही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तिच्याविरोधात यापूर्वी जामखेड, करमाळा, हडपसर, पिंपरी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव,
उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,
इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,
कुलदीप संकपाळ, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात, पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे,
अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, राजू मोमीण, अतुल डेरे, निलेश शिंदे, प्रकाश माने, सलमान खान, नंदू जाधव,
विशाल चौधर, गणेश डेरे, निलेश केमदारने, महिला पोलीस अंमलदार रेश्मा जगताप, वंदना भोंग यांच्या पथकाने केली.

Related Posts