IMPIMP

Corona New Cases In India | कोरोना केसमध्ये 6.4% घट ! गेल्या 24 तासात कोविड-19 च्या 1 लाख 68 हजार नवीन केस, 277 जणांचा मृत्यू

by nagesh
Corona New Cases In India | coronavirus 168063 news cases while 277 deaths reported in last twenty four hours

नवी दिल्ली : वृत्त संस्थाCorona New Cases In India | देशात कोरोनाचा अनियंत्रित वेग थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. मात्र, कालच्या तुलनेत आज कोरोनाच्या नवीन केसमध्ये घट झाली आहे. मागील 24 तासात 1 लाख 68 हजार 63 नवीन केस समोर आल्या आहेत तर 277 लोकांचा मृत्यू झाला.
(Corona New Cases In India) कालच्या तुलनेत आज कोरोनाच्या नवीन केसमध्ये 6.4 टक्के घट झाली आहे. सोमवारी 1 लाख 79 हजार नवीन केस
समोर आल्या होत्या (Covid-19 New Cases Today).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मात्र, या दरम्यान 69,959 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. या नवीन केस आल्यानंतर देशात कोरोना संक्रमितांची एकुण प्रकरणे वाढून 3 कोटी 58
लाख 75 हजार 790 झाली आहेत. तर, आतापर्यंत या महामारीमुळे 4 लाख 84 हजार 213 लोकांचा जीव गेला आहे.

कोविड-19 मधून आतापर्यंत देशात 3 कोटी 45 लाख 70 हजार 131 लोक बरे झाले आहेत. तर, ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या धोक्यानंतर सक्रिय
रुग्णांची संख्या आता वाढून 8 लाख 21 हजार 446 झाली आहे. भारतात सोमवारी कोरोना व्हायरससाठी 15,79,928 सॅम्पल टेस्ट करण्यात आले.
कालपर्यंत एकुण 69 कोटी 31 लाख 55 हजार 280 सॅम्पल टेस्ट केली गेली आहेत. (Corona New Cases In India)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पहिल्या दिवशी 9 लाखापेक्षा जास्त प्रीकॉशन डोस

देशात कोरोना व्हायरस संसर्गाच्या प्रकरणात वेगाने वाढ होत असताना सोमवारी कोविड-19 विरोधी लशीचा प्रीकॉशन डोस देण्याच्या सुरूवातीच्या
पहिल्या दिवशी
इतर आजारांनी पीडित 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आणि आरोग्य कर्मचार्‍यांसोबतच पहिल्या फळीतील नऊ लाखापेक्षा जास्त लोकांना हा डोस
दिला गेला.

 

 

Web Title :  Corona New Cases In India | coronavirus 168063 news cases while 277 deaths reported in last twenty four hours

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime | पुण्याच्या बिबवेवाडीत इंजिनिअरकडून एकाचा चाकूने भोकसून खून; कारण समोर आल्यानंतर पोलिसही झाले हैराण

Dr Neelam Gorhe | अष्टविनायक तीर्थक्षेत्रस्थळी पायाभूत विकासाची कामे वेळेत पूर्ण करावीत – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

 

Related Posts