IMPIMP

Credit Card | …म्हणून भारतीय लोक क्रेडिट कार्डचा जास्त वापर करतात, ‘विक्रमी’ स्तरावर पोहचला ‘खर्च’; जाणून घ्या

by nagesh
UPI Credit Card Linking | rbi allows upi credit card linking these banks are offering service how to link process

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात क्रेडिट कार्ड (Credit Card) चा वापर वेगाने वाढत आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारतीयांनी क्रेडिट कार्डद्वारे (Credit Card) 80 हजार कोटी रुपये खर्च केले, जे वर्षभरापूर्वीच्या तुलनेत 57 टक्के जास्त आहे. हा आकडा महामारीपूर्वीच्या स्तरापेक्षा सुद्धा खुप जास्त आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

लॉकडाऊनपूर्वीचा स्तर मागे टाकला

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकड्यांनुसार, मागील वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन (Lockdown) लावण्यापूर्वी सुद्धा भारतीय लोक क्रेडिट कार्डचा इतका वापर करत नव्हते. जानेवारी 2020 मध्ये क्रेडिट कार्डद्वारे भारतीय लोकांनी 67,402.25 कोटी रुपये खर्च केले होते, फेब्रुवारी 2020 मध्ये तो 62,902.93 कोटी रूपये होता. यावर्षी ऑगस्टमध्ये हा खर्च 77,981 कोटी रुपये होता.

 

 

6 महिन्यात 16 टक्के वाढला वापर

मोतीलाल ओस्वाल (Motilal Oswal) च्या एका रिपोर्टनुसार, मागील सहा महिन्यादरम्यान भारतीय लोकांद्वारे क्रेडिट कार्डने करण्यात येणारा सरासरी मासिक खर्च सतत वाढत आहे. सहा महिन्यापूर्वी भारतीय लोक जिथे सरासरी दरमहिना क्रेडिट कार्डने 10,700 रुपये खर्च करत होते, आता ते सरासरी 12,400 रुपये करत आहेत. यात सहा महिन्यात सुमारे 16 टक्के वाढ झाली आहे.

 

 

 सणाच्या हंगामाचे मर्यादित योगदान

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात क्रेडिट कार्डने (Credit Card) जास्त खर्चाचे श्रेय अनेक विश्लेषक सणाच्या हंगामाला देत आहेत. हे खरे असले तरी इतर काही कारक सुद्धा आहेत. यापैकी प्रमुख कारक आहे क्रेडिट कार्ड इश्यू करण्यात तेजी आली आहे. क्रेडिट कार्डहोल्डर्सची संख्या देशात वेगाने वाढली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

केवळ सप्टेंबरमध्ये इश्यू झाले इतके क्रेडिट कार्ड

एकट्या सप्टेंबरमध्ये देशात 11 लाख नवीन क्रेडिट कार्ड (Credit Card) इश्यू झाले.
यामुळे क्रेडिट कार्डची संख्या 6.5 कोटीवर पोहचली आहे, तसेच 10.8 टक्के तेजीसह 11 महिन्यातील सर्वात मोठी वाढ नोंदली आहे.
याचे मुख्य कारण क्रेडिट कार्ड इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा वाढत आहे.
आयडीएफसी बँक (IDFC Bank) सारख्या नवीन संस्था यामध्ये उतरत आहेत.

 

 

क्रेडिट कार्ड देण्यात ही बँक आघाडीवर

सप्टेंबरच्या अखेरपर्यंत उपलब्ध आकडे पाहिले तर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड देण्याच्या बाबतीत सर्वात वर आहे.
एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड होल्डर्सची संख्या 149.8 लाखावर पोहचली आहे.

यानंतर एसबीआय कार्डने 125.8 लाख क्रेडिट कार्ड जारी केले आहेत.
यानंतर 117 लाख कार्डसह आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), 75.1 लाख कार्डसह अ‍ॅक्सीस बँक (Axis Bank), 31 लाख कार्डसह आरबीएल बँक (RBL Bank), 25.9 लाख कार्डसह सिटी बँक (CitiBank) आणि 24.4 लाख कार्डसह कोटक महिंद्रा बँकेचे (Kotak Mahindra Bank) स्थान आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title: Credit Card | credit card spending by indians at peak due to these reasons hdfc bank top issuer ahead of sbi cards

 

हे देखील वाचा :

LPG Cylinder Price | तुम्हाला स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागतील 1000 रुपये ! जाणून घ्या मोदी सरकारची योजना?

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

MP Dr Amol Kolhe | राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल, राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

 

Related Posts