IMPIMP

Crime News | ‘चॉकलेट’ खाल्ल्याने एकाचवेळी चार मुलांचा तडफडून मृत्यू

by nagesh
Crime News | Four children died at the same time after eating chocolate

लखनौ : सरकारसत्ता ऑनलाइन Crime News | उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. चॉकलेट (Chocolate) खाल्ल्याने एकाचवेळी चार मुलांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून प्रशासनातील अधिकारीही दाखल झाले आहेत. दरम्यान, घराच्या बाहेर ही चॉकलेट कोणी टाकली होती हे अद्याप स्पष्ट झाले नाही. (Crime News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कयासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिसईच्या लठऊर टोला (अनुसूचित जमाती) शी संबंधित असलेल्या दोन कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. मृतांमध्ये दोन मुले व दोन मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, घराच्या दारासमोर सकाळी ७ वाजता कोणीतरी चॉकलेट फेकली होती. (Crime News)

 

 

ती चॉकलेट या चारही मुलांनी खाल्ली. काही वेळातच ती तडफडू लागली आणि त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार दारात पडलेली चॉकलेट मुलांनी वाटून खाल्ली. त्यानंतर पाच मिनिटातच मुले तडफडायला लागली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. ही चॉकलेट दारात कोणी टाकली हे स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

 

Web Title : Crime News | Four children died at the same time after eating chocolate

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | ED च्या कारवाईनंतर नारायण राणे यांचा CM उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले – ‘आगे आगे देखिए होता है क्‍या’

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचा भाव किती? जाणून घ्या लेटेस्ट दर

Jitendra Awhad On ED | …तर मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही – जितेंद्र आव्हाड

Crime News | दुर्देवी ! हैदराबादमध्ये भंगार गोदामाला लागलेल्या आगीत 11 मजुरांचा होरपळून मृत्यू

 

Related Posts