IMPIMP

Crypto Currencies | संपूर्ण जगात हजारो ‘क्रिप्टोकरन्सी’ पण ‘या’ 10 ‘प्रमुख’, ज्यांच्याबाबत सर्वांना माहित असणे आवश्यक; होईल मोठा ‘नफा’, जाणून घ्या

by nagesh
Cryptocurrency | cryptocurrency 6 crypto coins gain up to 234075 pc in a day check details here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Crypto Currencies | सध्या संपूर्ण जगात हजारो क्रिप्टोकरन्सी (crypto currencies) चलनात आहेत. इतकी मोठी संख्या, पहिल्यांदा क्रिप्टोकरन्सीचा वापर करणार्‍यांसाठी समस्या बनते. त्यांना समजत नाही की, प्रत्यक्षात कोणत्या क्रिप्टोकरन्सीवर विश्वास ठेवावा. याशिवाय, कधी-कधी काही अज्ञात क्रिप्टोकरन्सीची व्हॅल्यू अचानक 100% पेक्षा जास्त होते, ज्यामुळे त्यांची बेपत्ता होण्याची भिती (FOMO) सुद्धा वाढते.

जर तुम्हाला क्रिप्टोकरन्सी (crypto currencies) मध्ये ट्रेड करायचे असेल तर क्रिप्टोकरन्सीबाबत जाणून घेण्यापूर्वी काही तपासलेल्या आणि पारखलेल्या क्रिप्टोकरन्सी (crypto currencies) बाबत समजून घेणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन आम्ही ऑगस्ट 2021 पर्यंतच्या मार्केट व्हॅल्यूच्या आधारावर 10 प्रमुख क्रिप्टोकरन्सी निवडल्या आहेत, जेणेकरून तुम्ही क्रिप्टोबाबत चांगल्याप्रकारे जाणून घेवू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

1. Bitcoin

Bitcoin जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी आहे. या ओरिजनल क्रिप्टोकरन्सीला 2009 मध्ये Satoshi Nakamoto च्या नावाच्या, एखाद्या व्यक्तीने किंवा ग्रुपने बनवले होते. बहुतांश क्रिप्टोकरन्सी प्रमाणे, Bitcoin सुद्धा एका ब्लॉकचेनवर चालते, जे हजारो कम्प्युटरचे एक नेटवर्क आहे आणि एखादा ब्रोकर किंवा एजंटशिवाय रियल-टाइममध्ये ट्रांजक्शन व्हेरिफाय करते.

चांगल्या सुरक्षेशिवाय अतिरिक्त कॉन्सेप्टचे Bitcoin कोणत्याही टाईपच्या हॅकिंगपासून पूर्णपणे सुरक्षित आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस याचे मार्केट कॅप 856 बिलियन डॉलरपेक्षा जास्त होते. एका Bitcoin ची किंमत पाच वर्षापूर्वीच्या 500 डॉलरवरून वाढून, आज जवळपास 45,000 डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. याचा अर्थ हा आहे की या दरम्यान एकुण 8900% चा आश्चर्यकारक रिटर्न मिळाला आहे.

 

 

2. Ethereum

Ethereum एक ब्लॉकचेन नेटवर्क आहे ज्याचे मूळ टोकन Ether किंवा ETH आहे आणि यास सामान्यपणे एक क्रिप्टोकरन्सच्या रूपात सुद्धा ओळखले जाते. जर तुम्ही एनएफटी (NFT) ला डिजिटल प्रकारे विकले जाण्याच्या बाबत ऐकले असेल, तर तुम्हाला माहित असायला हवे की त्यांना बहुतांश Ethereum ब्लॉकचेनचा वापर करून प्रोसेस केली जाते.

हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे जो अपग्रेड असणे आणि ट्रेंडमध्ये टॉपवर कायम राहण्याचा प्रयत्न सतत करत राहतो. याच्या नवीन उपक्रमाचा उद्देश, जीवश्म इंधनावरील अवंलबत्वामध्ये मोठी घट आणणे आहे.

क्रिप्टोकरन्सी प्रमाणे, याने आश्चर्यकारक रिटर्न दिला आहे, जो पाच वर्षाच्या कालावधीत 11 वरून वाढून 3000 पेक्षा सुद्धा जास्त झाला आहे. 27,000% चा हा रिटर्न जबरदस्त आहे. सध्या, याचा एम-कॅप 57 बिलियनपेक्षा जास्त आहे, जो यास जगातील सर्वात दुसरी मोठी क्रिप्टोकरन्सी बनवतो.

जर तुम्ह विचार करत असाल की, अशाप्रकारचा रिटर्न कसा मिळवावा, तर आम्ही सुचवलेल्या Zebpay च्या वापराबाबत आवश्य विचार करा. हे तुम्हाला केवळ 100 रूपयांनी सुरूवात करणे आणि आपल्या पसंतीच्या क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करण्याची सुविधा देते. आपली पहिली क्रिप्टो करन्सी खरेदी करण्यासाठी, तुम्हाला केवळ तुमचा मोबाइल नंबर नोंदवावा लागेल आणि केवायसीची सोपी प्रक्रिया करून स्वताला व्हेरिफाय करावे लागेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 3. Binance Coin

70 बिलियनपेक्षा जास्त मार्केट कॅपचे Binance Coin सध्याच्या काळात तिसरी सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे. तिचा वापर ट्रेडिंग, पेमेंट प्रोसेसिंग किंवा ट्रॅव्हल बुकिंगसाठी सुद्धा केला जाऊ शकतो. सोबतच, क्रिप्टोकरन्सीच्या इतर रूपात जसे की, Ethereum किंवा Bitcoin साठी सुद्धा ती ट्रेड किंवा एक्सचेंज करता येऊ शकते.

भारतात, क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म Zebpay आपल्या वापरकर्त्यांसाठी आणखी काही सुविधा प्रदान करतो. झेबपेसोबत केवायसी-रजिस्टर्ड वापरकर्त्यांना निवडक क्रिप्टो होल्डिंग्जवर, दैनिक रिटर्न मिळतो. प्रत्यक्षात, तुम्हाला केवळ काही क्रिप्टोच्या होल्डिंगच्या बदल्यात क्रिप्टोमध्ये पेमेंट मिळते. यामध्ये रिटर्नचा दर 1% ते 7.5% पर्यंत असतो जो तुमच्याकडील कॉईन आणि क्रिप्टोकरन्सीवर अवलंबून असतो. झेबपे, क्रिप्टोकरन्सी स्टोअर करणे आणि आपल्या क्रिप्टो होल्डिंग्जवर, रिटर्न जनरेट करण्याची चांगली पद्धत आहे.

 

 

4. Cardano

Cardano एक नवीन क्रिप्टोकरन्सी आहे, परंतु तिने येताच लोकप्रियता मिळवली आहे आणि यावेळी सर्वात जास्त चर्चित क्रिप्टोकरन्सी आहे. मोठ्या क्रिप्टोकरन्सीच्या तुलनेत कमी खर्चात ट्राजक्शन व्हॅलिडेट करण्यासाठी, यास नवीन आणि विश्वासार्ह प्रूफ-ऑफ-स्टेक मेथडसाठी ओळखले जाते. ऑगस्ट 2021 च्या अखेरीस तिचे मार्केट कॅप 69 बिलियन डॉलर होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

5. Tether

64 बिलियन एम-कॅपची Tether, एक वेगळ्या प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे. तिला स्टेबल कॉईन म्हटले जाते. ती अमेरिकन डॉलरसारखी फिएट करन्सीद्वारे समर्थित आहे, जी तिला इतर अस्थिर क्रिप्टोकरन्सीच्या तुलनेत जास्त स्थिर आणि विश्वासार्ह बनवते.

 

 

 6. XRP

XRP ला डिजिटल टेक्नॉलॉजी कंपनी Ripple च्या टीमने बनवले आहे. तिचा वापर नेटवर्क म्हणून, वेगवेगळ्या प्रकारची करन्सी एक्सचेंज करण्यासाठी केला जातो, यामध्ये फिएट करन्सीशिवाय इतर प्रमुख क्रिप्टोकरन्सीचा सुद्धा समावेश आहे. ऑगस्ट 2021 च्या अखेरीस XRP चे मार्केट कॅप 52 बिलियन होते.

 

7. Dogecoin

मीमच्या रूपात सुरूवात झालेली ही करन्सी 40 बिलियनपेक्षा जास्त व्हॅल्यूची क्रिप्टोकरन्सी झाली आहे.
यात रंजक बाब ही आहे की 2017 मध्ये Dogecoin ची व्हॅल्यू 0.0002 होती आणि आज ती 0.31 आहे.
याचा अर्थ हा आहे की, पाच वर्षात यामध्ये 154900% ची वाढ झाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

8. Polkadot

Polkadot करन्सी 2020मध्ये लाँच करण्यात आली होती. अवघ्या एका वर्षात, तिची व्हॅल्यू 2.93 ने वाढून 25.61 झाली,
म्हणजे 774% ची वाढ झाली. Polkadot चे वैशिष्ट्य हे आहे की, ती एक क्रिप्टोकरन्सी नेटवर्क बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
जी विविध ब्लॉकचेनला जोडते, जेणेकरून त्यांना सोबत मिळून काम करता येऊ शकते. तिचे एम-कॅप सध्या 25 बिलियनपेक्षा जास्त आहे.

 

 

9. USD Coin

USD Coin आणखी एक स्टेबल कॉईन आहे. याची मार्केट व्हॅल्यू 23 बिलियन आहे आणि सतत वाढत चालली आहे.
हे चलन Ethereum द्वारे संचालित आहे आणि याचा वापर संपूर्ण जगात कुठेही ट्रांजक्शन करण्यासाठी केला जाऊ शकतो.

 

 

 10. Solana

शेवटी जाणून घेवूयात Solana बाबत. ही,20 बिलियनपेक्षा जास्तची एम-कॅपची क्रिप्टोकरन्सी आहे.
ती अलिकडेच आपल्या युनिक हायब्रिड प्रूफ-ऑफ-स्टेक आणि प्रूफ-ऑफ-हिस्ट्री मेकॅनिज्मसाठी चर्चेत होती.
हे मॅकेनिज्म, ट्रांजक्शन जलद आणि सुरक्षित प्रकारे प्रोसेस करण्यात मदत करते.
Solana करन्सी 2020 मध्ये लाँच करण्यात आली त्यावेळी तिची किंमत 0.77 होती आणि आज ती 9405% वाढून 73.19 वर व्यवहार करत आहे.

इतके सर्व पर्याय उपलब्ध असल्याने, आता तुम्हाला हा निर्णय घेण्यास सोपे होईल की, कोणती क्रिप्टोकरन्सी तुमच्यासाठी सर्वात योग्य ठरेल.
विचारपूर्वक निर्णय घेतल्यानंतर, तुम्ही यापैकी कोणत्याही करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंटची सुरुवात कमी पैशाने करू शकता.

जसे की आम्ही अगोदर सांगितले की, तुम्ही यासाठी एक Zebpay खाते उघडू शकता आणि केवायसीसंबंधी औपचारिकता पूर्ण करून,
इन्व्हेस्ट करण्यास सुरूवात करू शकता.
इतकेच नव्हे, तुम्ही Zebpay Earn च्या मदतीने आपल्या पसंतीची क्रिप्टोकरन्सी होल्ड करून क्रिप्टो सुद्धा कमावू शकता.

 

Web Title : Crypto Currencies | earn money from 10 major cryptocurrencies everyone should know about

 

हे देखील वाचा :

BJP MLA Sunil Kamble | आमदार सुनिल कांबळेंवर गुन्हा दाखल करा; पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पोलिसांना निवेदन

BJP MLA Sunil Kamble | आमदार कांबळे यांचा सर्वपक्षीय महिला पदाधिकाऱ्यांकडून निषेध, कारवाईची मागणी

Pune Rural Police | मोठी कारवाई ! पुणे विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रं बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

 

Related Posts