IMPIMP

Dagdusheth Ganpati | ‘दगडूशेठ’ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य; ससून रुग्णालयातील रुग्णांना आणि सामाजिक संस्थांमध्ये होणार आंब्याच्या प्रसादाचे वाटप (Video)

by nagesh
Dagdusheth Ganpati | ‘Dagdusheth’ Mahanaiveda of 11 thousand mangoes to Ganapati; Mango prasad will be distributed to patients of Sassoon Hospital and social organizations (Video)

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Dagdusheth Ganpati | साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या (Akshaya Tritiya 2023) मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती केलेली आंब्यांच्या आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभा-यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. (Dagdusheth Ganpati)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Policenama (@policenamaa)

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे (Suvarnayug Tarun Mandal) मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. (Dagdusheth Ganpati)

 

यापूर्वी पहाटे ४ ते सकाळी ६ पर्यंत गायक अविनाश चंद्रचूड, विश्वजित जोशी, सावनी रवींद्र यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. त्यानंतर सकाळी ८ वाजता विशेष गणेशयाग आणि रात्री ९ वाजता भजन विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळाच्यावतीने उटीचे भजन झाले. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Dagdusheth Ganpati | ‘Dagdusheth’ Mahanaiveda of 11 thousand mangoes to Ganapati; Mango prasad will be distributed to patients of Sassoon Hospital and social organizations (Video)

 

हे देखील वाचा :

Basweshwar Jayanti 2023 | महात्मा बसवेश्वर: सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक

Ajit Pawar | पुण्यात अजित पवार यांचे झळकले बॅनर; जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू (Video)

Basweshwar Jayanti 2023 | समतेची शरण चळवळ आणि महात्मा बसवण्णा

Indian Pest Control Association – IPCA | इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशन : आरोग्यदायी घरासाठी ‘पेस्ट कंट्रोल’ गरजेचे; जनजागृती व्हावी

 

Related Posts