IMPIMP

Deepak Kesarkar | शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवणं बेकायदेशीर, कायदेशीर उत्तर देऊ’ – दीपक केसरकर

by nagesh
Deepak Kesarkar | MLA deepak kesarkar on shiv sena chief uddhav thackeray

गोवा : वृत्तसंस्था – Deepak Kesarkar | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बंडखोर आमदारांनी गोव्यात (Goa) जल्लोष साजरा केला. त्यानंतर शिवसेनेने (Shivsena) एक मोठा निर्णय घेत एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. याबाबत पत्र सेनेकडून पाठवण्यात आले आहे. दरम्यान, यासंदर्भात बोलताना शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पदावरुन हटविने बेकायदेशीर असल्याचं पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “सभागृहाच्या नेत्याचा अपमान होतो तेव्हा हक्कभंग येतो. इतकं हे पद महत्वाचे आहे. त्यांच्या पक्षांला हे शोभणार नाही. ही कृत्य लोकशाहीला शोभादायक नाही. आमच्याकडे राजकारणाची चर्चा होत नाही. कायदेशीर लढाई असेल तर त्याला कायदेशीर उत्तर देवू. पहिल्यादा अध्यक्ष निवड त्यानंतर विश्वासदर्शक ठराव येईल. त्यानंतर मंत्रिमंडळाची चर्चा होईल. आता कोणतीच चर्चा त्या संदर्भात झालेली नाही. आमचं कुटुंब एकत्र आहे. पण आमचे कुटुंब प्रमुख बाहेर आहे. ते आमच्यात आले तर आम्हाला आनंद होईल.”

 

दरम्यान, पुढे केसरकर म्हणाले, “शिवबंधन हे खरं नाते, अफिडेव्हिट हे खरं बंधन नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही वक्तव्य केले तर आम्ही उत्तर देणार नाही. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटविल्याचे पाठवलेलं पत्र बेकायदशीर आहे. यावर आम्ही कायदेशीर उत्तर देऊ.”

 

दरम्यान, ‘एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. शिवसैनिकांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा,’ आरोप उद्धव ठाकरे यांनी काल केला.
त्यानंतर शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेने याबाबतचं पत्र काढले आहे.
या कारवाईमुळे आता शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Deepak Kesarkar | it is illegal to remove eknath shinde from the post of shiv sena leader say deepak kesarkar

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | खुशखबर ! राज्यात पाऊस सक्रिय ! 7 जुलैपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता – IMD

BJP MLA Ashish Shelar | CM एकनाथ शिंदेंनी सांभाळलेल्या नगरविकास खात्याविरोधात आशिष शेलार यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका; जाणून घ्या प्रकरण

Saamana Attack On BJP | वाजपेयी युगातील विचारधारेचा देशातील राजकारणातून अस्त; सामनामधून शिवसेनेने BJP वर साधला निशाणा

 

Related Posts