IMPIMP

Saamana Attack On BJP | वाजपेयी युगातील विचारधारेचा देशातील राजकारणातून अस्त; सामनामधून शिवसेनेने BJP वर साधला निशाणा

by nagesh
Maharashtra Politics News | bjp is burdened by eknath shinde government said mp sanjay raut

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Saamana Attack On BJP | सामनाच्या संपादकीयमध्ये भाजपचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेचा संदर्भ देत शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने आधी मोठे मन दाखवले असते तर ही परिस्थिती आली नसती, असे सामनामध्ये म्हटले आहे. (Saamana Attack On BJP) ’सामना’मध्ये लिहिले आहे की, अडीच वर्षांपूर्वी करारानुसार दिलेले आश्वासन पाळण्याचे ’मोठे मन’ भाजपने दाखवले असते, तर बचावाच्या नावाखाली मोठे मन दाखवण्याची वेळ आता या पक्षावर आली नसती. महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्यासाठी जी राजकीय नौटंकी केली जात आहे, त्या नौटंकीचे आणखी किती भाग शिल्लक आहेत, हे आज कोणी सांगू शकत नाही. राजकीय पंडित, चाणक्य डोक्याला हात लावून बसले आहेत, अशा घटना घडत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अटलबिहारी वाजपेयींची कविता, भाजपवर निशाणा

सामनामध्ये लिहिले होते की, भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांनीही त्यांच्या एका कवितेत म्हटले आहेः

छोटे मन से कोई ब़डा नहीं होता,
टूटे मन से कोई ख़डा नहीं होता

परंतु या ओळींच्या पूर्वी याच कवितेत वाजपेयी म्हणतात –

हिमालय की चोटी पर पहुंच,
एवरेस्ट विजय की पताका फहरा,
कोई विजेता यदि ईर्ष्या से दग्ध,
अपने साथी से विश्वासघात करे
तो उसका क्या अपराध
इसलिए क्षम्य हो जाएगा कि
वह एवरेस्ट की ऊंचाई पर हुआ था?
नहीं, अपराध अपराध ही रहेगा
हिमालय की सारी धवलता
उस कालिमा को नहीं ढक सकती!

 

या कवितेच्या माध्यमातून शिवसेनेने सामनामध्ये म्हटले आहे की, वाजपेयी युगातील त्यांची विचारधारा देशाच्या राजकारणाने उद्ध्वस्त केली आहे. काळ्याला पांढरे आणि पांढर्‍याला काळे बनवण्याचे नवे पर्व आता येथे अवतरले आहे, असे म्हणत भाजपवर हल्लाबोल केला आहे. (Saamana Attack On BJP)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यामुळे लहान मन आणि मोठे मन अशी चर्चा नव्याने केली जात आहे. महाराष्ट्रात लोकशाहीवर दरोडा घालणार्‍या या राजकीय नाट्याचे आणखी किती भाग बाहेर पडणार हे आता पाहावे लागेल.

 

देवेंद्र फडणवीस अनिच्छेने झाले उपमुख्यमंत्री

सामनामध्ये लिहिले आहे की, ‘जे घडायचे होते ते घडले, परंतु सर्वात धक्कादायक क्लायमॅक्स घडला. उपमुख्यमंत्री होणारे अचानक मुख्यमंत्री झाले आणि मी मुख्यमंत्री होणार असे वाटणार्‍यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही ते अनिच्छेने मान्य केले.

 

सामना (Saamana) मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, हा ’क्लायमॅक्स’वर टिप्पणी, परीक्षणांचा मारा सुरू असताना यातून ’मोठे मन’ आणि ’पक्षाशी निष्ठा’ पाळणारा असाच एक बचाव समोर आला. फडणवीस यांनी मोठे मन करून मुख्यमंत्रिपदा (Chief Minister) ऐवजी उपमुख्यमंत्री (Deputy CM) पद स्वीकारले, असा युक्तिवाद आता केला जात आहे.

 

Web Title :- Saamana Attack On BJP | shivsena remind late former pm atal bihari vajpayee poem in saamana attack on devendra fadanvis

 

हे देखील वाचा :

Pune-Bangalore Highway Accident | पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तिंघाचा मृत्यू तर एकजण जखमी

Eknath Shinde Cabinet | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपकडून ‘या’ चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता, शपथविधीचा मुहूर्त ठरला

Pune Crime | येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी, मित्राला मारल्याच्या कारणावरुन दगडाने मारहाण

 

Related Posts