IMPIMP

Delhi Crime | ‘हो, मी रागाच्या भरात श्रद्धाचा खून केला’; आफताबने न्यायालयात दिली कबुली

by nagesh
Delhi Crime | aftab poonawala accepts murdering shraddha walkar in court says whatever happened happened in the heat of the moment

दिल्ली: वृत्तसंस्था – वसईच्या श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) खून प्रकरणी आफताबला आज (दि. 22) न्यायालयात हजर करण्यात आले होते.
यावेळी त्याने श्रद्धाचा खून (Delhi Crime) केल्याची कबुली न्यायालयाला दिली आहे. आफताबला (Aaftab Poonawala) दिल्लीतील साकेत
न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याने न्यायाधीशांसमोर आपणच श्रद्धाची हत्या केल्याचे मान्य केले. न्यायालयाने आफताबच्या (Delhi
Crime) कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.

 

मी रागाच्या भरात कोणताही विचार न करता श्रद्धाचा खून केला, असा दावा आफताबने न्यायाधीशांसमोर केला. हत्येला सहा महिने झाले असून, मला काही गोष्टी आठवत नसल्याने मी पोलिसांना सांगू शकत नसल्याचे आफताबने (Delhi Crime) म्हंटले आहे. तसेच मी पोलिसांना तपासात सहकार्य करत असून, यापुढेही करेन असे आफताबने न्यायालयात कबूल केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांना सोमवारी महारोलीच्या जंगलात एक जबडा आणि आणि काही हाडे मिळाली आहेत.
हा जबडा आणि हाडे डॉक्टरांकडे पाठविली असून, डॉक्टर ही श्रद्धाची आहेत का, याची तपासणी करत आहेत.
आफताबची नार्को चाचणी (Narco Test) होणार आहे.
त्यामुळे ती करण्याअगोदर पॉलिग्राफ चाचणी होणे आवश्यक आहे.
न्यायालयाने परवानगी दिली नसल्याने सोमवारी आफताबची नार्को चाचणी होऊ शकली नाही.
न्यायालयाने पॉलिग्राफ चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तिच्या नंतर आफताबची नार्को चाचणी करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Delhi Crime | aftab poonawala accepts murdering shraddha walkar in court says whatever happened happened in the heat of the moment

 

हे देखील वाचा :

Bhagat Singh Koshyari | वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांचा दिल्ली दौरा

Pune Pimpri Crime | समाजसेवा करतो म्हणून कोयत्याने सपासप वार करुन पत्नीचा केला विनयभंग; वाकड परिसरातील घटना

MLA Pratap Sarnaik | ‘एकनाथ शिंदे यांनी मला 900 खोके दिले, पण…’; बाळासाहेबांची शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक यांचा उद्धव ठाकरे गटाला टोला

Eknath Khadse | गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

 

Related Posts