IMPIMP

Desecration of Shivaji Maharaj Statue | शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना ! कानडी पोलिसांची मराठी भाषिकांविरोधात दडपशाही, मध्यरात्री 27 जणांना अटक, 61 जणांवर FIR

by nagesh
Desecration of Shivaji Maharaj Statue | protest against Desecration of Shivaji Maharaj Statue belgaum karnataka

बंगळुरू : वृत्तसंस्थाबंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना (Desecration of Shivaji Maharaj statue) झाली. मात्र त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या मराठी (Marathi) बांधवांना कानडी पोलिसांच्या (Karnataka police) दडपशाहीचा (Belgaum Crime) सामना करावा लागत आहे. बेळगावमध्ये (Belgaum Crime) 61 जणांवर गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. तर 27 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी (police custody) सुनावण्यात आली आहे. (Desecration of Shivaji Maharaj statue)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

मराठी बांधवांच्या घरी मध्यरात्री जाऊन पोलिसांनी ही कारवाई (Belgaum Crime) केली. तसेच काही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याचा आरोप कानडी पोलिसांवर करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) याविरोधात आवाज उठवावा अशी मागणी सीमावर्तीत भागातील रहिवाशांकडून केली जात आहे. (Desecration of Shivaji Maharaj statue)

 

काय आहे प्रकरण?
कर्नाटकातील (Karnataka) बंगळुरुमध्ये शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. यानंतर या प्रकाराच्या निषेधार्थ बेळगावतील मराठी भाषिक रस्त्यावर उतरले. कर्नाटक पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली असून याठिकाणी ताणावाचे वातावरण आहे. यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी (CM) छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त व्यक्त केल्याने संताप व्यक्त होत आहे.

27 जणांना अटक
पोलिसांनी कालपासून आंदोलकांची धरपकड सुरु केली. युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके (Shubham Shelke) यांच्यासह 27 जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांना जामीन मिळू नये यासाठी 14 प्रकारची कलमे त्यांच्यावर लावण्यात आली. न्यायालयासमोर हजर केले असता काल सायंकाळी 27 जणांची हिंडलगा कारागृहात (Hindalga Jail) रवानगी करण्यात आली.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

दरम्यान, पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख नेते महापौर सरिता पाटील (Mayor Sarita Patil) यांच्यासह 34 जणांना अटक केली.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या मराठी बांधवांविरोधातच
कारवाईचा बडगा उगारल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

Web Title :- Desecration of Shivaji Maharaj Statue | protest against Desecration of Shivaji Maharaj Statue belgaum karnataka

 

हे देखील वाचा :

Udayanraje Bhosale | ‘आम्ही कधी कोणाची घरं फोडली नाहीत’ – खासदार उदयनराजे

Deepali Dhumal | ‘हे तर भाजपने केलेले गलिच्छ राजकारण’, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांची टीका

PM Kisan Scheme | मोठी बातमी ! ‘या’ लोकांच्या खात्यात येणार नाहीत 10 व्या हप्त्याचे पैसे, लवकर तपासून घ्या तुमचे नाव

 

Related Posts