IMPIMP

Devendra Fadnavis | ‘अजित पवारांच्या शब्दाला कोणतीही किंमत राहिली नाही’ – देवेंद्र फडणवीस

by nagesh
Vinayak Mete Accident | ncp ajit pawar made 2 important suggestions to the eknath shinde government after the accident of vinayak mete bjp devendra fadanvis reply

सरकारसत्ता ऑनलाइन – Devendra Fadnavis | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget session) उद्यापासून म्हणजेच 3 मार्चपासून सुरूवात होत आहे. याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना त्यांनी अनेक विषयांवरून ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यातील शेतकरी (Farmers) हवालदील झाला आहे कारण शेतीसाठी लागणाऱ्या वीजेचं कापण्याचं (Electricity Cut) काम या सरकारने चालू केलं आहे. आमच्या आता लक्षात आलं आहे की, अजित पवार यांच्या शब्दाला आता कोणतीही किंमत राहिली नाही. कारण मागील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं वीज कनेक्शन (Electricity connection) कापण बंद आणि शेवटच्या दिवशी सांगितलं की सुरू, त्यानंतर अधिवेशनातच बोलले की, मी त्यावेळी चुकीचं बोललो होतो मात्र आज ठामपणे सांगतो शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापणार नाही. मात्र आता स्पर्धा लागल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात असल्याचं फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितलं.

 

 

देवेंद्र फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीवरूनही (Farmer loan waiver) सरकारवर निशाणा साधला.
त्यासोबतच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांच्यावरही टीका केली.
राज्य सरकारने कर्जमाफी केल्यानंतर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार रूपये अनुदान मिळणार असल्याची घोषणा केली होती मात्र तेही अद्याप लोकांना मिळालेले नाहीत.
ते लवकरात लवकर मिळावेत यासाठी अधिवेशनात आम्ही आग्रही भूमिका घेणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, राज्याचे ऊर्जामंत्री ज्या प्रकारची वक्तव्य करत आहेत त्यावरून तरी असं वाटत आहे की आपण लोकशाहीमध्ये (Democracy)
नाही तानाशाहीत राहत आहोत.
आम्ही कनेक्शन तोडणारच राज्य सरकारची (State Government) ही अहंकारी भूमिका तोडायला लावू आणि शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहू, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | Ajit Pawar’s words have no value Devendra Fadnavis

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार?, जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

Corona New Guidelines | राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, मुंबई – पुण्यासह ‘या’ 14 जिल्ह्यांना मोठा दिलासा

Healthy Heart | हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी करा; जाणून घ्या

Maharashtra Temperature | महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल, पुण्यात ‘या’ तारखेपासून बसणार उन्हाचा चटका

 

Related Posts