IMPIMP

Healthy Heart | हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी करा; जाणून घ्या

by nagesh
Healthy Heart | to keep the heart healthy read this news

सरकारसत्ता ऑनलाइन – Healthy Heart | हृदय (Heart) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. पूर्वी केवळ वृद्धांनाच हृदयरोग (Heart Disease) होतो, असे मानले जायचे. पण हल्ली तरुणांमध्येही हृदयरोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. हृदय निरोगी (Healthy Heart) ठेवण्यासाठी काही उपाय, योगासनं (Yoga) आणि डाएटिंगविषयी (Dieting) आपण पाहणार आहोत. या सर्व गोष्टींचा अवलंब करून आपण हृदयाची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हृदय निरोगी ठेवण्याचे मार्ग (Healthy Heart Tips)
जर तुम्हाला हृदय निरोगी (Healthy Heart) ठेवायचं असेल तर रोज व्यायाम (Exercise) करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास व्यायाम करावा. यामुळे तुमचे हृदय निरोगी राहील आणि शरीरही सर्व आजारांपासून दूर राहील. हृदयासाठी हा सर्वोत्तम कार्डिओ व्यायाम (Cardio Exercise) आहे. याशिवाय पोहणं किंवा सायकलिंग (Cycling) करणेही चांगल व्यायाम आहे.

 

हृदय निरोगी ठेवण्यासाठी रात्री लवकर झोपून डिजिटल गॅजेट्सचा कमीत कमी वापर करावा (Get a better night’s sleep by turning off electronic gadgets)

कमी चरबीयुक्त अन्न (Low Fat Diet) खाल्ले पाहिजे. रात्री कमी किंवा न खाण्याव्यतिरिक्त, सकाळी भरपूर प्रमाणात प्रोटीन (Protein) आणि फायबर (Fiber) खाल्ले पाहिजे. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. जास्त वजन वाढण्यामुळे हृदयरोगाचा धोकाही संभवतो, त्यामुळे वजन नियंत्रणात (Weight Control) ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे.

 

दारू (Alcohol), धूम्रपान (Smoking) यासारख्या सवईंचा शरीरावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे या गोष्टींचे सेवन करू नये. यामुळे केवळ हृदयच नव्हे तर शरीराच्या इतर भागांनाही अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांचे सेवन टाळायला हवे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

व्यायामाव्यतिरिक्त योगासनेेही फायदेशिर ठरतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी योगासनांचे अनेक प्रकार वापरले जाऊ शकतात.
सूर्यनमस्कार (Surya Namaskar), पश्चिमोत्तासन (Paschimottanasana), अंजली मुद्रा (Añjali Mudrā), भुजंगासन (Bhujangasana), सेतू बांधासन (Setu Bandha Sarvangasana), त्रिकोणासन (Trikonasana) इत्यादी अशी काही आसने आहेत.

 

यांचे हृदयावर वेगवेगळे परिणाम होतात आणि ते निरोगी करण्यासाठी ते उपयोगी ठरतात. याशिवाय इतर अनेक आजार बरे होतात.
फायबरयुक्त फळे (Fruits) आणि भाज्या (Vegetable) खाल्ल्याने हृदयाचे गंभीर आजार टाळता येतात.
व्यायाम, फळे, भाज्या, योगासने इत्यादींव्यतिरिक्त हृदय निरोगी राहण्यात सकस आहारही महत्वाचा आहे.
याशिवाय मीठ (Salt) आणि मिठाईचाही (Sweets) वापर कमी करावा, जेणेकरून हृदय निरोगी राहील.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या गोष्टींमुळे हृदयविकार होतात (These Things Cause Heart Attack).

मोबाइल-कॉम्प्युटर आदींचा अधिक वापर केल्याने हृदयावरही वाईट परिणाम होऊन हार्ट ब्लॉक (Heart Block), स्ट्रोकसारखे (Stroke) आजार होतात.
जंक फूडसारखे (Junk Food) बाह्य पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने हृदयरोग होतो.

मिठाशिवाय अन्नाला चव नाही, पण हृदयविकाराच्या रुग्णांसाठी मिठाचं अतिप्रमाणात सेवन करणं हानिकारक मानलं जातं.
याच्या अतिवापरामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

केवळ मधुमेहाच्या रुग्णांसाठीच नव्हे तर हृदयविकाराच्या रुग्णांसाठीही गोड पदार्थ घातक ठरू शकतात.

मद्यपान, धूम्रपान आणि नशा (Intoxication) इत्यादींचे सेवन करणार्‍या व्यक्तींना हृदयरोग होण्याची भिती जास्त आहे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Heart | to keep the heart healthy read this news

 

हे देखील वाचा :

Maharashtra Temperature | महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल, पुण्यात ‘या’ तारखेपासून बसणार उन्हाचा चटका

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Empty Stomach-Ghee | सकाळी उपाशी पोटी खा एक चमचा तूप आणि राहा दिर्घकाळ निरोगी

 

Related Posts