IMPIMP

Devendra Fadnavis | त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे वजन खरंच 128 किलो होते?

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis on uddhav thackeray shivsena eknath shinde dasra melava 2022

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनDevendra Fadnavis | माझे वजन सध्या १०२ किलो आहे. बाबरी पाडायला (Babri Masjid Demolition) गेलो होतो, तेव्हा १२८ किलो होते, त्यात लाजायचे काय असा प्रश्न विरोधी पक्षनेते (BJP Leader) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी मुंबईत केल्यानंतर त्यांच्या वजनाविषयी नव्याने चर्चा सुरु झाली आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी त्यांचे वजन खरंच १२८ किलो होते का याची चर्चा नव्याने सुरु झाली आहे. त्यादृष्टीने त्यांचे जुनी छायाचित्र पाहिली असता त्याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै १९७० रोजी जन्म झाला. ६ डिसेंबर १९९१ रोजी बाबरी मशीद पाडली. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे अवघ्या २२ वर्षाचे होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कालच्या भाषणात सांगितल्यानुसार ते फेब्रुवारी १९९२ मध्ये नगरसेवक झालो. जुलैमध्ये वकील झालो आणि डिसेंबरमध्ये नगरसेवक, अ‍ॅडव्होकेट फडणवीस बाबरी पाडायला गेले होते.

 

 

याबाबत त्यांचे जुने काही फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाले आहेत. त्यात त्यांनी २००६ मध्ये नागपूरमधील एका कपड्याच्या दुकानात मॉडेलिंग केले होते. या दुकानात फडणवीस यांनी राखाडी आणि लाल रंगाचे स्वेटर घालून फोटो शुट केले होते. त्यावेळी देवेंद्र फडणीस हे आमदार होते. त्यावेळी ते ३६ वर्षांचे होते. त्यावेळचे फोटो पाहिल्यास देवेंद्र फडणवीस हे सध्या पेक्षा खूपच सडपातळ वाटतात. त्यांचे आणखी काही जुने फोटो पाहिल्यावर त्यात ते मुख्यमंत्री असतानाच्या काळापेक्षा कमी अंगाने बारीक दिसतात. त्यामुळे १९९१ – ९२ साली खरंच ते म्हणतात, इतके १२८ किलो वजनाचे (Devendra Fadnavis Weight) होते का अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Devendra Fadnavis | At that time Devendra Fadnavis really weighed 128 kg?

 

हे देखील वाचा :

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

Nana Patole | महापालिका निवडणुकीत ‘एक कुटुंब-एक तिकीट’ फॉर्म्युला – नाना पटोले

Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

 

Related Posts