IMPIMP

Devendra Fadnavis | मंत्रालयातील बोगस नोकर भरती प्रकरणी चौकशीनंतर कारवाई- उपमुख्यमंत्री फडणवीस (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | deputy cm devendra fadnavis announced to investigate case of bogus recruitment in the ministry

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – विधानसभेत मंत्रालयातील बोगस नोकरभरतीमधील रॅकेटची चौकशी करून अपराधींविरोधात कारवाई करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत केली. मंत्रालयात कारकून पदावर नोकरीला लावतो असे सांगून लालूच दाखवत 12 बेरोजगारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये चार जणांची टोळी सक्रिय असून, त्यांनी ही फसवणूक केली आहे. प्रत्येक वेळी काही तरी वेगळे सांगून या बेरोजगारांकडून 74 लाख रुपयांची रक्कम घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी माहिती घेऊन चौकशी करून कारवाई करणार असल्याचे फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या १२ बेरोजगार युवकांची वेळोवेळी फसवणूक केली गेली. त्यातून ७४ लाख रुपयांची रक्कम त्यांच्याकडून आरोपींनी घेतली. यातील विशेष गोष्ट म्हणजे, या सर्व युवकांची मुलाखत मंत्रालयातच सामान्य प्रशासन विभागात घेतली गेली. यासाठीची आवश्यक असणारी वैद्यकीय तपासणी ही जे. जे. रुग्णालयात (J. J. Hospital) पार पाडण्यात आली. या झालेल्या सर्व प्रक्रियेवर अधिष्ठाता यांच्या सह्यादेखील आहेत. याप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात (Chembur Police Station) गुन्हा (FIR) दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

या प्रकरणात मालाडमध्ये राहणाऱ्या एका युवकाचा परिचय महेंद्र सकपाळ (Mahendra Sakpal नावाच्या व्यक्तीबरोबर झाला. सदर युवक स्वतः आणि त्याच्या दोन भावांसाठी नोकरी मिळवण्याकरिता भटकत होता. याबाबतची माहिती सकपाळ यांना समजली. माझ्या परिचयाचे नितीन साठे (Nitin Sathe) हे मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात सचिव आहेत असे त्या युवकास सांगितले. सामान्य प्रशासन विभागात (General Administration Department) कारकून या पदासाठीची भरती असून, साठे यांना बोलून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्या युवकास आपल्या जाळ्यात ओडले.

 

 

बेरोजगारीने त्रस्त असल्याने त्या युवकाने स्वतः आणि दोन भावांसाठी पैसे देण्याची प्रथमदर्शनी तयारी दाखविली.
त्याप्रमाणे नऊ लाख रुपये सुरुवातीला सकपाळ यांना दिले. कारकून पदासाठीची लागणारी कागदपत्रे त्यामध्ये फोटो,
आधार कार्ड या तीन युवकांनी सकपाळ यांच्याकडे दिली.
यावर महेंद्र सकपाळांनी यांना मंत्रालयात मुलाखत व वैद्यकीय तपासणी जे. जे. रुग्णालयात करण्यात येईल,
असे सांगितल्याची माहिती समजली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मंत्रालयातील (Mumbai Mantralaya) कारकून बोगस नोकर भरती प्रकरणी (Bogus Recruitment Case)
किती जणांचा सहभाग आहे. या प्रकरणामध्ये अजून कोणकोणत्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
तसेच मुलाखतीच्या वेळी कुणाच्या ओळखपत्राचा वापर केला गेला, कुणाच्या कृपेने हे रॅकेट कार्यरत होते,
अशा अनेक प्रश्नांचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांनी आज या प्रकरणाची खोलवर चौकशी करण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे यातील दोषी कोण आहेत ते लवकरच समजणार आहे.

 

Web Title :– Devendra Fadnavis | deputy cm devendra fadnavis announced to investigate case of bogus recruitment in the ministry

 

हे देखील वाचा :

Constipation | या फूड्सने पोटात वाढतील गुड बॅक्टेरिया, ताबडतोब गायब होईल बद्धकोष्ठतेची समस्या

Pune Crime News | ब्रेड परत करण्यासाठी गेलेल्या मुलास बेदम मारहाण, समर्थ पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा

Chandrashekhar Bawankule | छलकपटाने सत्तेत आलेल्या सरकारचा वचपा निसर्गाने काढला, चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

 

Related Posts