IMPIMP

Devendra Fadnavis | ‘मतदारांनी सारं काही झुगारुन लोकशाही निवडली’, सिंधुदुर्ग जिल्हा बँक विजयावर फडणवीसांचे मोजकं, पण सूचक विधान

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis chandrakant patil reaction on sindhudurg district bank election results

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनसिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) भाजपच्या (BJP) पॅनलने विज्य मिळवल्यानंतर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपच्या राज्य पातळीवरील मुख्य नेत्यांकडून नारायण राणे (Narayan Rane) यांचे या विजयासाठी अभिनंदन केले जात आहे. आता या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांचे अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टोला लगावला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलीसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, हे सारे काही झुगारुन मतदारांनी लोकशाही (Democracy) निवडली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) तसेच सर्व भाजप नेते, कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही मुंबईच्या निकालाची नांदी !

ही मुंबई, ठाणे व नवी मुंबईच्या महापालिका निकालाची नांदी आहे, असे भाजप आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी म्हटले आहे. देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यानं… आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…, असं शेलार यांनी म्हटलं. तसेच मा. अमित शाह (Amit Shah) म्हणाले त्याप्रमाणे हिंमत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत, असं आव्हानही त्यांनी आघाडीला दिलं.

 

Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis chandrakant patil reaction on sindhudurg district bank election results

 

हे देखील वाचा :

Maharashtra Lockdown Again | महाराष्ट्रात पुन्हा लागणार का लॉकडाऊन?, आरोग्य मंत्र्यांनी केले मोठे वक्तव्य

Maharashtra Lockdown | ‘राज्यात लॉकडाऊनची स्थिती येतेय, त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार’ – विजय वडेट्टीवार

Narayan Rane | ‘सिंधुदुर्ग झालं आता राज्याकडे लक्ष’ !

Vitamin D Deficiency | शरीरात ‘व्हिटॅमिन डी’च्या मोठ्या कमतरतेचे संकेत आहेत ‘ही’ 5 लक्षणे, बहुतांश लोक करतात दुर्लक्ष

 

Related Posts