IMPIMP

Devendra Fadnavis | ‘चिंता करू नका, भाजप ग्रामपंचायतींच्या निकालात बाजी मारेल’ – देवेंद्र फडणवीस

by nagesh
Devendra Fadnavis | deputy cm devendra fadnavis announced to investigate case of bogus recruitment in the ministry

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा आज (दि. 20) निकाल जाहीर होणार आहे. रविवारी या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकांची आज मतमोजणी होत असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा निकाल यावेळी जाहीर होईल. या निवडणुकांत जनतेतून थेट सरपंच निवडून दिला जाणार आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे. या निवडणुकांत भारतीय जनता पक्षच बाजी मारणार असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. नागपुरात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत फडणवीस बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना भाजपचा विजय होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) व्यक्त केला. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आहे. मी आजच तुम्हाला सांगतो, लिहून घ्या, महाराष्ट्रात पुन्हा नंबर एक भारतीय जनता पक्षच असेल. आपल्याला बहुमत मिळेल. कोणी काहीही काळजी करु नका. पुन्हा एकदा जनता आपल्या पाठिशी उभी राहणार आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.

 

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच निवडीसाठी
रविवारी मतदान पार पडले होते. यापैकी सर्वाधिक ग्रामपंचायती विदर्भातील आहेत.
विदर्भात एकूण 2276 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले असून,
आज कोण बाजी मारणार याबद्दल गावागावांत उत्सुकता आहे.
विदर्भाबरोबरच सिंधुदुर्ग 293, कोल्हापूर 431, सोलापूर 1418, नागपूर 236, नाशिक 196 अहमदनगर 1965 आणि बीड 670 ग्रामपंचायतींचा निकालही मंगळवारी जाहीर होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | gram panchayat election 2022 results devendra fadnavis says bjp will be number one party

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दारुसाठी पैसे न दिल्याने लोखंडी रॉडने हल्ला करुन खून

Winter Session 2022 | सत्ताधाऱ्यांना हिवाळी अधिवेशनात घेरण्यासाठी खास ठाकरे ‘नीती’; आयोजित केली आमदारांची खास बैठक…

Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन जबरी चोरी करणाऱ्या दोन जणांना पुणे पोलिसांकडून अटक

MPSC Students Protest in Pune | पुण्यात MPSCचे विद्यार्थी आक्रमक; आंदोलन करत केल्या ‘या’ मागण्या

 

Related Posts