IMPIMP

Devendra Fadnavis | गुवाहटीला जाण्यासाठी कडूंनी पैसे घेतल्याचा आरोप करणारे रवि राणा नरमले, फडणवीसांनी केली कानउघडणी!

by nagesh
Devendra Fadnavis | mla ravi rana apologized for bachchu kadu after meet devendra fadanvis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी गुवाहटीला जाण्यापूर्वी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी पैसे घेतल्याचा आरोप भाजपा (BJP) समर्थक आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी केला होता. यानंतर या दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. यावरून पोलिसात तक्रारीदेखील दाखल केल्या होत्या. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वेळीच लक्ष देण्यास सांगितले होते, अन्यथा तुम्हालाही नोटीस पाठवेन, असा इशारा दिला होता. दरम्यान, पचास खोके, एकदम ओक्के प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर येऊ नये म्हणन शिंदे गटाच्या (Shinde Group) काही आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राणांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अमरावतीचे आमदार रवी राणा आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर रवी राणा यांनी सपशेल माघार घेतली आहे. बच्चू कडू यांच्याबाबत विधान केल्याबद्दल रवी राणांनी दिलगिरी व्यक्त केली.

कडू-राणा वाद मिटवण्यासाठी रविवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत साडेतीन तास चर्चा झाली. त्यानंतर सकाळी रवी राणा यांना फडणवीसांच्या बंगल्यावर बोलावण्यात आले, यानंतर रवी राणा नरम झाले. फडणवीसांना भेटल्यानंतर रवि राणा म्हणाले, जे काही वाद झाले, जे काही शब्द वापरले गेले त्यावरून वाद झाला होता. ते शब्द मी मागे घेतो.
आता बच्चू कडू आणि मी अमरावतीचे आमदार आहोत. बोलता बोलता तोंडातून जे काही गुवाहाटीबद्दल निघाले,
शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार, नेते, सहकारी आहेत, ते सगळे आमच्या सोबत आहे.
त्यामुळे गुवाहाटीबद्दल काही बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आ. रवि राणा पुढे म्हणाले, पण बच्चू कडू यांच्या सुद्धा काही अपशब्द निघाले होते.
मी खिसे कापून लोकांना किराणा वाटतो, हे न पचणारे आहे. त्यामुळे बच्चू कडू त्यांचे शब्द मागे घेतील.
आम्ही दोघेही सरकारचे घटक आहोत. त्यामुळे या पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या
सरकारसोबत आहोत, सरकारला बळकट करण्याचे काम करणार आहोत. आमच्या वादापेक्षा किंवा शब्दाचा
गैरअर्थ काढण्यापेक्षा आमदार आणि सहकार्‍यांमध्ये गैरसमज झाला असेल किंवा कुणाची मने दुखावली असतील
तर माझे शब्द मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून हा वाद संपला आहे.

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | mla ravi rana apologized for bachchu kadu after meet devendra fadanvis

 

हे देखील वाचा :

T20 World Cup 2022 | टीम इंडियाला मोठा झटका! ‘हा’ प्रमुख खेळाडू बांग्लादेश विरुद्ध नाही खेळणार

Nana Patole | नाना पटोलेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले ‘शिंदे सरकारमधील अनेक आमदार माझ्या संपर्कात’

Aaditya Thackeray | शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा गंभीर आरोप, ‘आदित्य ठाकरेंच्या बैठकीत दारु पार्ट्या झाल्याचे व्हिडीओ बाहेर काढू का?’

 

Related Posts