IMPIMP

Devendra Fadnavis | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करता येणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by nagesh
Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | No decision to shift textile commissioner's office to Delhi - Devendra Fadnavis

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन –  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन (पेन्शन) योजना लागू केल्यास राज्यावर 1 लाख 10 हजार कोटी
रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra
Fadnavis) यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद (Maharashtra Winter Session) सदस्य डॉ.सुधीर
तांबे, जयंत पाटील, एकनाथ खडसे, राजेश राठोड, विक्रम काळे, अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केला होता, त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोणत्याही सरकारला आपला शासकीय कर्मचारी खुश व्हावा, असे वाटत असले तरी सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणे शक्य नाही. ही योजना लागू केल्यास भविष्यात निवृत्तीवेतन देताना काढण्यात आलेल्या रकमेवर कर्जाचे व्याज देण्यासाठीही कर्ज काढावे लागेल. सध्या महसूल तूट जास्त आहे. त्यामुळे हे दायित्व आपण स्वीकारू शकत नसल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली.

 

शासनाच्या काही विभागाचा आकृतीबंध तयार झाला असून काही विभागाचा आकृतीबंध तयार करण्यात येत आहे. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा विचार करून हा आकृतीबंध तयार करण्यात येत आहे. यास राज्य शासन लवकरात लवकर मान्यता देईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

सध्या राज्य हे दिवाळखोरीत नसून आपली विकसनशील अर्थव्यवस्था असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस
यांनी उत्तरात सांगितले. सन 2022-23 या आर्थिक वर्षी व्याज, वेतन आणि निवृत्तीवेतन यावर शासनाचे
59 टक्के खर्च केले जात असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
त्याच बरोबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात आमदारांची नवीन समिती नियुक्त केली जाणार नसल्याचे त्यांनी उत्तरात सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | Old pension scheme cannot be implemented for state government employees – Deputy Chief Minister Devendra Fadnavis

 

हे देखील वाचा :

Malaika Arora | अरहान खानला वाटते आई मलायकापेक्षा ‘ही’ व्यक्ती अधिक जवळची…

MP Rahul Shewale | ‘राहुल शेवाळे एका महिलेला परदेशात घेऊन गेले होते तेव्हा…’ ठाकरे गटाच्या नेत्याकडून मोठा गौप्यस्फोट

MP Supriya Sule | ‘धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी, केंद्राने स्पष्ट करावे’ – खा. सुप्रिया सुळे

Nitesh Rane | ‘A फॉर अफताब अन् A फॉर आदित्य, सगळ्या विकृतांचे नाव एकसमान’; सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

 

Related Posts