IMPIMP

Devendra Fadnavis | ‘या’ दिवशी होणार राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली तारिख

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis answer criticism of uddhav thackeray over thane woman beating case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  Devendra Fadnavis | राज्यातील सत्तांतराणानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. या
सरकारमध्ये मंत्रीमंडळ विस्तारासाठी (Cabinet Expansion) ३० दिवसाचा कालावधी लागला. त्यानंतर विद्यमान सरकारचा पहिला मंत्रीमंडळ
शपथविधी पार पडला. यात बऱ्याच जेष्ठ नेत्यांना तसेच इच्छुकांना डावलण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात तरी आपल्याला संधी मिळेल या आशेने अनेक नेते वाट बघत बसले आहेत. त्यातच नुकतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य केले आहे. त्यामुळे प्रतिक्षेत असणाऱ्या आमदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता, त्यावर त्यांनी स्पष्टचं भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील मंत्रीमंडळास कुठलीही कायदेशीर अडचण नाही. कायदेशीर आणि घटनात्मक सरकार स्थापन करून कार्यरत आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाला पाहिजे हे मला देखील वाटते. कारण इतकी खाती सांभाळायची त्यापेक्षा आपल्याकडे दोन सभागृह आहेत. तेव्हा एकाच वेळी सभागृहात एकच चर्चा होते. त्यावेळी ओढातान होते. त्यामुळे विस्तार आम्हाला करायचा आहे. आणि तो आम्ही करू. असं यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

तसेच, या मंत्रीमंडळ विस्तारात कुठलीही कायदेशीर अडचण नाही. योग्यवेळी आम्ही हा विस्तार करू. शक्यतो हा विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी करायचा आहे. असंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले. राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. त्यामुळे २७ फेब्रुवारी पूर्वी किंवा २७ फेब्रुवारी पर्यंत शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सध्याच्या मंत्रीमंडळात एकूण २० मंत्री आहेत. यात शिंदे गटाकडे (Shivsena Shinde Group) ९ मंत्रीपदं तर
भाजपकडे (BJP) ९ मंत्रीपदं आहेत. यात सर्वाधिक खाती ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत.
मागील चार महिन्यांपासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे.
या अगोदर हा मंत्रीमंडळ विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल. असे सांगण्यात आले होते.
परंतु तो अजूनपर्यंत झाला नाही. यावरून हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार
(Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. लवकर मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याने
शिंदे-फडणवीस सरकारचे अनेक आमदार नाराज झाल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी समोर आले होते.
प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी याबाबतची नाराजी बोलून दाखवली होती.

 

Web Title :-  Devendra Fadnavis | the second cabinet expansion of the state government is likely to take place before the budget session devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Karuna Sharma | धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी करूणा शर्मा अडचणीत; करूणा शर्मा यांच्याविरोधात परळी पोलिसांत गुन्हा दाखल…

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुना क्लब, गेम चेंजर्स संघांची विजयी घौडदौड; गेम चेंजर्सच्या देवदत्त नातू याची १११ धावांची खेळी !!

Ajit Pawar | मुंबई महापालिका निवडणुकीवर अजित पवारांनी व्यक्त केली उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची इच्छा; म्हणाले…

 

Related Posts