IMPIMP

‘त्यांच्या’ प्रामाणिकपणाला सलाम ! 10 वर्षे नगरसेवक, 5 वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष अन् आता करताहेत वॉचमनची नोकरी

by pranjalishirish
devram tijore was corporator nagpur municipal corporation now working as watchman

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राजकारणात एकदा प्रवेश केला अन् एखादं छोटं-मोठं पद मिळालं तर ती व्यक्ती मोठ्या पदावर जाते हेच सध्याचे चित्र आपण पाहिले असेल. स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, सरपंच, नगरसेवक यांसारखी पद उपभोगणाऱ्या राजकारण्याचा रुबाब मोठा असतो. यांसारखी अगदी छोटी पद असणाऱ्या लोकांभोवती कार्यकर्त्यांचा गराडा असतो. पण आता 10 वर्षे नगरसेवक आणि 5 वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलेले नेता करतोय वॉचमनची Watchman  नोकरी.

‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका

देवराम तिजोरे असे या व्यक्तीचे नाव आहे. ते 72 वर्षांचे आहेत. त्यांनी नागपूर महानगरपालिकेत 10 वर्षे नगरसेवकपद उपभोगले होते. तसेच 5 वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते. यातील विशेष बाब म्हणजे एकेकाळी नागपुरातील सुधार प्रन्यासचे ते ट्रस्टी होते तिथेच ते आता वॉचमन  Watchman म्हणून काम करत आहेत. तिजोरे हे सध्या वॉचमनची नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

तिजोरे यांनी 1985 मध्ये काँग्रेसकडून आणि 2002 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून महानगरपालिका निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते निवडूनही आले होते. त्यांनी नगरसेवकपदाचा कार्यभार आत्तापर्यंत 10 वर्षे सांभाळला. तर त्यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती. इतकी वर्षे सत्तेत असतानाही त्यांनी स्वत:साठी काहीच कमावलं नाही. राजकीय कार्यकिर्दीत त्यांनी विविध प्रश्न सोडवत लोकांची सेवा केली. राजकारण हे स्वत:च्या स्वार्थासाठी नसते, असे त्यांचे म्हणणे आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत, शरद पवारांसोबत ‘वाझें पे चर्चा’

2 खोल्यांच्या घरात वास्तव्य

स्थायी समितीचे अध्यक्षपद स्वत: कडे असतानाही त्यांनी स्वत:साठी काहीही कमावले नाही. सध्या ते 2 खोल्यांच्या घरात राहतात. पैशांअभावी त्यांच्या घराचे रंगकामही रखडले आहे. तसेच त्यांच्या घरात मोडकळीस आलेले फर्निचर आहे. त्यांच्याकडे बंद पडलेली गाडीही आहे, हीच संपत्ती त्यांच्याकडे सध्या आहे.

Also read : 

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र

Gulabrao Patil : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ‘कोरोना’ पाँझिटिव्ह

रितिकाच्या आत्महत्येवर गीता फोगाट म्हणाली, ‘जिंकणं-हारणं हा तर खेळाडूच्या आयुष्याचा भाग’

IPL 2021 : ‘मुंबई इंडियन्स’ला मोठा फटका, पाकिस्तानमुळं वाढलं टेन्शन ! जाणून घ्या नेमकं प्रक

राष्ट्रवादीने केले CM उद्धव ठाकरेंचे समर्थन, म्हणाले – ‘वाझेंना सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर कोणाचाही दबाव नव्हता’

मुंबईत Lockdown होणार की नाही? पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

Related Posts