IMPIMP

Divorce In Love Marriage | प्रेम विवाहात घटस्फोटांचे प्रमाण जास्त; दहापैकी चार जोडपी करतात अर्ज

by nagesh
Divorce In Love Marriage | most divorces are in love marriages four out of ten couples court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Divorce In Love Marriage | सध्या भारतात प्रेम विवाहाचे प्रमाण वाढत आहे. कांदापोह्याच्या कार्यक्रमांद्वारे लग्न जुळवून कोणत्या अनोख्या व्यक्तीबरोबर विवाह करण्यापेक्षा प्रेम विवाह केलेलाच बरा, असे अनेक तरुण-तरुणींना वाटत असते. मात्र, प्रेम विवाहात जुळलेल्या विवाहसारखा नवेपणा नसतो. त्यामुळे एकमेकांबरोबर फिरणे, आवडीनिवडी माहिती करणे, हे सर्व प्रकार आधीच झालेले असतात. त्यामुळे बहुतांश प्रेम विवाहित जोडप्यांचा लग्नानंतरचा उत्साहच पूर्णत: संपून जातो. (Divorce In Love Marriage)

 

मग प्रेमाची जागा वादविवाद घेते. दोघांचीही ऐकून घेण्याची तयारी नसल्याने भांडणे विकोपाला जातात आणि मग भविष्य व मुलांचा विचार न करताच जोडपी घटस्फोटासाठी न्यायालयात जातात. असे प्रकार विभक्त कुटुंबपद्धती, दोघांच्या उत्पन्नातील विषमता, नातेवाइकांचा नको तितका हस्तक्षेप, जोडीदाराकडून अपेक्षा, एकमेकांना वेळ देता येत नसल्यामुळे होत असलेली चिडचिड आदी कारणांमुळे पती-पत्नींच्या नात्यात दुरावा येत आहे. त्यामुळे प्रेम विवाह केलेली जवळपास दहापैकी तीन ते चार जोडपी घटस्फोटासाठी अर्ज करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Divorce In Love Marriage)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विवाह या संस्थेत तडजोड अत्यंत महत्त्वाची आहे.
तसेच ठरवून केलेल्या विवाहाला ज्या प्रकारचा सामाजिक पाठिंबा मिळतो त्या प्रकारचा पाठिंबा प्रेम विवाहाला मिळत नाही.
त्यामुळे येणाऱ्या प्रसंगाला जोडप्याला स्वतः सामोरे जावे लागते.
त्यामुळे जर जुळवून घेण्याची क्षमता नसेल, तर या नात्याला तडा जातो असे दिसून येत आहे.

 

Web Title :- Divorce In Love Marriage | most divorces are in love marriages four out of ten couples court

 

हे देखील वाचा :

Pune Crime | यूएसए क्रिकेट लीग शेअर्सच्या आमिषाने 55 लाखांची फसवणूक; सौरभ पांडे, वंदना कृष्णा, राशीद खान, सिराज हुसेन आणि विक्रम चौधरी यांच्यावर FIR

Pune Crime | शरीर संबंधासाठी मुलगी देण्याच्या बहाण्याने 53 वर्षाच्या व्यक्तीचे अपहरण करून उकळले पैसे; पुण्यातील प्रकार

 

Related Posts