IMPIMP

Pune Crime | यूएसए क्रिकेट लीग शेअर्सच्या आमिषाने 55 लाखांची फसवणूक; सौरभ पांडे, वंदना कृष्णा, राशीद खान, सिराज हुसेन आणि विक्रम चौधरी यांच्यावर FIR

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | यूएसए क्रिकेट लीगचे शेअर्स मिळवून देण्याच्या आमिषाने एका इसमाची 55 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी 2019 पासून हा प्रकार सुरू होता. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींना फिर्यादीला यूएसए क्रिकेट कौन्सिलकडे 20 – 20 क्रिकेट स्पर्धा चालू करण्याचे आणि या क्रिकेट लीगचे 40 टक्के शेअर्स मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
आरोपींनी फिर्यादींचा विश्वास संपादन करून वेळोवेळी 55 लाख रुपये उकळले.
मात्र, त्यांना 40 टक्के शेअर्स मिळवून न देता आणि त्यांचे पैसेदेखील परत न करता त्यांचा विश्वासघात केला आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी काटे यांनी पोलिसांत धाव घेतली आणि
अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) गुन्हा दाखल करून घेतला आहे.

सौरभ पांडे, वंदना कृष्णा, राशीद खान, सिराज हुसेन आणि विक्रम चौधरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या
आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी मुंबईचे रहिवाशी आहेत. यांच्याविरोधात आशिष पोपटराव काटे
(वय 41, पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | 55 lakh fraud with lure of getting shares of usa cricket league pune crime news today

 

हे देखील वाचा :

Pune Crime | शरीर संबंधासाठी मुलगी देण्याच्या बहाण्याने 53 वर्षाच्या व्यक्तीचे अपहरण करून उकळले पैसे; पुण्यातील प्रकार

Military Recruitment for Woman | पुण्यात महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळावा सुरू

 

Related Posts