IMPIMP

Divyang Pension Yojana | कोणत्या लोकांना मिळतात ‘या’ पेन्शनचा लाभ, जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती

by nagesh
Digital Artist | woman earning huge money without leaving bedroom business success story

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Divyang Pension Yojana | देशातील अनेक राज्य सरकारे दिव्यांगांसाठी पेन्शन योजना राबवत आहेत. ज्यामध्ये अर्धवट किंवा पूर्ण दिव्यांग व्यक्तींना दरमहा 1000 रुपयांपर्यंत पेन्शन दिली जात आहे. ही पेन्शन (Pension) जन्मजात अपंग आणि अपघातामुळे (Accident) अपंगत्व आलेल्या लोकांना दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया आणि योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याबाबत सविस्तर माहिती जाणून घेवूयात. (Divyang Pension Yojana)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

दिव्यांग पेन्शन योजनेसाठी कसा करावा अर्ज –
उत्तर प्रदेशमध्ये समाज कल्याण विभाग दिव्यांगांसाठी पेन्शन योजना राबवत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी sspy-up.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. त्यानंतर या योजनेत मिळणारी पेन्शन तुमच्या बँक खात्यात जमा होत राहील.

 

इतके वार्षिक उत्पन्न असेल तर मिळणार नाही लाभ –
दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ फक्त दारिद्रयरेषेखालील लोकांनाच मिळतो. समाजकल्याण विभागाच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण भागात वार्षिक 46080 रुपये आणि शहरी भागात 56460 रुपये वार्षिक उत्पन्न असावे. तसेच, तुम्हाला उत्तर प्रदेशच्या समाज कल्याण विभागाच्या वेबसाइटवर या योजनेशी संबंधित सर्व माहिती मिळेल. (Divyang Pension Yojana)

या गोष्टींची घ्या विशेष काळजी –
या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. अर्जदार हा उत्तर प्रदेशचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि किमान 40% अपंगत्व असणे आवश्यक आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याशिवाय, अर्जदार वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, विधवा निवृत्ती वेतन, समाजवादी निवृत्ती वेतन किंवा अशाच कोणत्याही योजनेंतर्गत निवृत्ती वेतन/अनुदान/मदत प्राप्त करणारी कोणतीही व्यक्ती आणि सरकारी संस्था/घरांमध्ये मोफत उदरनिर्वाह होणारी व्यक्ती पात्र नसेल.

 

दिव्यांग पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

अर्जदाराचे आधार कार्ड

वयाचा दाखला

ओळखपत्र

रहिवासी प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

उत्पन्नाचा दाखला

अपंगत्व प्रमाणपत्राची रितसर साक्षांकित प्रत

बँक खाते पासबुक

पासपोर्ट साइज फोटो

 

 

Web Title :- Divyang Pension Yojana | divyang pension yojana which people get the benefit of this pension know all the details

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission Updates | मोदी सरकार देणार 2 लाख रुपयांपर्यंतची भेट ! 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना होईल फायदा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घसरण; जाणून घ्या लेटेस्ट भाव

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! फक्त 150 रुपये गुंतवा अन् मिळवा तब्बल 20 लाख रुपये; जाणून घ्या

 

Related Posts